AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीच्या घरासमोर गेला अन्…प्रेयसीच्या ‘या’ कृत्यानंतर केलं भयानक कांड; गोड प्रेमाचं हादरवणारं रुप!

एका तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने हे कृत्य का केलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

प्रेयसीच्या घरासमोर गेला अन्...प्रेयसीच्या 'या' कृत्यानंतर केलं भयानक कांड; गोड प्रेमाचं हादरवणारं रुप!
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 15, 2025 | 10:14 PM
Share

प्रेमात अपयश आलेले लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. अशातच आता मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाने हे कृत्य का केलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

प्रियकराने स्वतःला पेटवलं

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय अजय कुशवाह नावाच्या प्रियकराने त्याच्या प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतले. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रेयसी त्याच्यासोबत बोलत नव्हती, त्यामुळे अजय मानसिक तणावात होती. यात तणावात शनिवारी रात्री त्याने प्रेयसीच्या घराबाहेर स्वतःवर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

अजय 75 टक्के भाजला

अजयने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून अजयला रुग्णालयात नेले. यावेळी अजय 75 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या अजय जळत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.

वडिलांचा गंभीर आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कुशवाह हा फर्निचरचे काम करतो. तर त्याचे वडील भाजीपाला विकतात. अजयच्या वडिलांनी मुलीवर गंभीर आरोप केला आहे. अजयची प्रेयसी त्याला लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळत होती. कालांतराने मुलीकडून होणाऱ्या पैशाची मागणी खूप वाढली, जी अजय पूर्ण करू शकला नाही, म्हणून त्याने हे पाऊल उचलले.

भांडणामुळे प्रेयसी बोलत नव्हती

अजय आणि त्याची प्रेयसी एकमेकांचे मित्र होते. काही काळानंतर दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले. मात्र भांडणामुळे प्रेयसीने अजयशी बोलणे बंद केले. यामुळे अजय नैराश्यात होता. याच तणावातून त्याने हे मोठे पाऊस उचलले असल्याची माहिती समोर आली आहे. आता पोलिस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

Follow Us
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
Video : सावित्रीबाई फुलेंनीही 200 वर्षांपूर्वी…. रुपाली चाकणकर यांच्या विधानामुळे संताप, नेमकं काय म्हणाल्या?
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट