Extramarital Affair : नवरा झोपल्यावर रात्रीचा व्हिडिओ कॉल करायचा, एका नाजूक क्षणी इमोशनल झालेल्या विवाहितेकडून चूक झाली, मग…
Extramarital Affair :नवरा आपल्याला कसा त्रास देतो, त्या बद्दलच्या गोष्टी महिला युवकाला सांगू लागली. हळू-हळू दोघांमध्ये जवळीक वाढली. रोज तो युवक महिलेला फोन करु लागला, नंतर त्याने व्हिडिओ कॉल सुरु केले.

ज्यावेळी आपल्याला एकटं वाटतं, त्यावेळी वाटतं की, कोणीतरी आपल्यासोबत असावं. कोणीतरी आपलं ऐकावं. पण अनेकदा मनातल्या गोष्टी सांगण्याच्या नादात आपण चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो. नंतर तेच आपला फायदा उचलतात. असच यूपीमध्ये लनखऊ येथे राहणाऱ्या एका महिलेसोबत झालं. महिला तिच्या नवऱ्याला कंटाळलेली. कारण तो तिला मारहाण करायचा. महिलेची नंतर इन्स्टाग्रामवर एका युवकासोबत ओळख झाली.
नवरा आपल्याला कसा त्रास देतो, त्या बद्दलच्या गोष्टी महिला युवकाला सांगू लागली. हळू-हळू दोघांमध्ये जवळीक वाढली. रोज तो युवक महिलेला फोन करु लागला, नंतर त्याने व्हिडिओ कॉल सुरु केले. नवरा झोपल्यानंतर तो महिलेला व्हिडिओ कॉल करायचा. या दरम्यान त्याने महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवला. महिला त्या युवकाच्या प्रेमात इमोशनल झालेली. याचा युवकाने भरपूर फायदा उचलला. युवकाने नंतर अचानक एक दिवस महिलेकडे 50 हजार रुपये मागितले. मागणी पूर्ण झाली नाही, तेव्हा युवकाने तिचा बनवलेला अश्लील व्हिडिओ व्हायरल केला. त्यानंतर महिलेने पोलीसात तक्रार दिली. पोलीस सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
नंतर व्हिडिओ कॉलचा हट्ट
पीजीआय पोलीस ठाणे विभागातील हे प्रकरण आहे. एका विवाहित महिलेने पोलिसांकडे आरोपी युवकाविरोधात एफआयआर नोंदवली. तिने सांगितलं की, माझा नवरा मला मारहाण करायचा. त्याच्या या वागण्याला कंटाळून इन्स्टाग्रामवर माझी एका मुलाबरोबर मैत्री झाली. मी त्याला माझ्या मनातलं सर्वकाही सांगितलं. युवकाने माझ्याकडे फोन नंबर मागितला. मी सुद्धा त्याला माझा फोन नंबर दिला. तो रोज मला फोन करायचा. नंतर व्हिडिओ कॉलचा हट्ट करु लागला.
मी त्याच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या होत्या
पीडितेने सांगितलं की, “नवरा झोपल्यानंतर मी त्याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायची. त्याने मला आश्वासन दिलेलं की, तो माझ्याशी लग्न करणार. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने माझा अश्लील व्हिडिओ बनवला. नंतर त्याने माझ्याकडे 50 हजार रुपये मागितले. पैसा नाही दिले,तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मी माझा नाईलाज त्याला सांगितला, इतके पैसे माझ्याकडे नव्हते. नंतर त्याने खरच माझा व्हिडिओ व्हायरल केला. मी त्याच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या होत्या. फक्त 50 हजार रुपये दिले नाही, म्हणून तो माझ्यासोबत असं वागला. मला न्याय हवा आहे”
