AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेयसीला व्हॅलेन्टाईन गिफ्ट देण्यासाठी मोटारसायकलची चोरी, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात

वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे माणिकपूर पोलिसांनी चोरट्यावर लक्ष केंद्रित केले होते. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपी चंद्रेश पाठक याला दहिसर परिसरातून अटक करण्यात आली.

प्रेयसीला व्हॅलेन्टाईन गिफ्ट देण्यासाठी मोटारसायकलची चोरी, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
वसईत बाईक चोराला अटकImage Credit source: TV9
| Updated on: Feb 13, 2023 | 8:51 PM
Share

वसई / विजय गायकवाड (प्रतिनिधी) : व्हॅलेंटाईन डे उद्यावर येऊन ठेपला आहे. आपल्या प्रियसीला काय गिफ्ट द्यायचे या चिंतेत अनेक प्रियकर आहेत. मात्र वसईतील एका अतिउत्साही प्रियकराने नामी शक्कल लढवत प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी चक्क इलेक्ट्रिक मोटारसायकलचीच चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेत माणिकपूर पोलीस ठाण्यात प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 5 वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकलही जप्त केल्या आहेत. चंद्रेश पाठक असे अटक आरोपी प्रियकराचे नाव आहे.

आरोपी चोरटा कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट

चंद्रेश पाठक हा कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट झालेला आहे. नायगाव स्टेशनजवळ पार्क केलेली इलेक्ट्रिक मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.

गुप्त माहितीच्या आधारे दहिसरमधून आरोपीला अटक

वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे माणिकपूर पोलिसांनी चोरट्यावर लक्ष केंद्रित केले होते. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपी चंद्रेश पाठक याला दहिसर परिसरातून अटक करण्यात आली.

व्हॅलेन्टाईन डे ला प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी चोरी

आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने व्हॅलेन्टाईन डे ला आपल्या प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी मोटारसायकलची चोरी केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या चोरट्या प्रियकराकडून 3 लाख 90 हजार किमतीच्या 5 मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत करून दोन गुन्हे उघड केले आहेत.

मालेगावमध्ये तीन संशयिताकडून 12 मोटारसायकली जप्त

मालेगाव शहरातील मोटार सायकली चोरीचे प्रमाण वाढले असून, आता पोलिसांनी चांगलेच मनावर घेतले असल्याचे दिसून येत आहे. मालेगाव शहर आणि परिसरातून मोटारसायकली चोरणाऱ्या तिघांना मालेगाव कॅम्प पोलिसांनी अचक केली आहे.

आरोपींकडून आतापर्यंत 12 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून आणखी चोरलेल्या मोटारसायकली मिळण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. लवकरच जप्त केलेल्या मोटार सायकली मूळ मालकांना परत केल्या जातील.

शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.