मधुचंद्राच्या रात्री नवरी एकटीच, नवरा येतच नव्हता; दुसऱ्या दिवशी कपाट उघडताच… पोलिसही चक्रावले
एक विचित्र घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एका नवविवाहित जोडप्याच्या लग्नाच्या रात्री 22 लाख रुपयांचे दागिने गायब झाले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन दिवसांनंतर ते दागिने त्या घराजवळच सापडले.

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील सर्वात खास क्षण असतो. प्रत्येक मुलीला वाटते की हा दिवस तिच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असावा. अगदी सामान्य मुलींप्रमाणेच केरळमधील एक नवविवाहित नवरी आपल्या सासरी अनेक स्वप्ने घेऊन आली. पण लग्नाच्या दुसऱ्या रात्री जेव्हा तिने आपल्या खोलीतील कपाटाचा दरवाजा उघडला, तेव्हा सर्वांना धक्काच बसला. आता नेमकं प्रकरण काय होतं चला जाणून घेऊया…
ही घटना केरळमधील कण्णूर येथील आहे, जिथे लग्नाच्या दुसऱ्या रात्री नवविवाहित नवरी आपल्या खोलीत जाते. खोलीत गेल्यावर जेव्हा ती कपाट उघडते, तेव्हा ती इतकी जोरात ओरडते की आजूबाजूच्या घरांच्या लायटी लागतात. खरे तर, लग्नाच्या धावपळीमध्ये नवरीने लाखो रुपयांचे दागिने कपाटात काळजीपूर्वक ठेवले होते. विवाहित महिला आर्चा, एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे, जिचे 1 मे रोजी ए. के. अर्जुन यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर, आर्चाने आपले दागिने काढून एका शोल्डर बॅगेत ठेवले आणि ती बॅग पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटात ठेवली. वाचा: पत्नीने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला, संतापलेल्या पतीने… सत्य समोर येताच बसला धक्का
रात्री 9 च्या सुमारास, जेव्हा आर्चाने कपाट उघडले, तेव्हा तिला दागिने गायब झाल्याचे दिसले. दागिन्यांची किंमत सुमारे 22 लाख रुपये होती. आर्चाच्या कुटुंबाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी डॉग स्क्वॉडसह घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आणि सर्व पाहुण्यांची यादी बनवून तपासणी सुरू केली. पण काहीच पुरावा सापडला नाही. पण दोन दिवसांनंतर असे काही घडले की सर्वांच्या भुवया उंचावल्या.
दोन दिवसांनंतर… जे घडले
7 मे च्या सकाळी, जेव्हा पोलिस पुन्हा एकदा घराच्या आजूबाजूला तपास करत होते, तेव्हा घरापासून फक्त दोन मीटर अंतरावर झुडपांमध्ये एक पांढऱ्या कापडाची पिशवी सापडली. खरे तर, लग्नाच्या दिवशी चोरीला गेलेले सर्व दागिने चोराने दोन दिवसांनंतर घराजवळ पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवले होते. त्यात बांगड्या, हार, कमरबंद, अंगठ्या, झुमके, सर्व काही जसेच्या तसे आणि सुरक्षित होते.
हा ‘प्रामाणिक चोर’ कोण होता?
पोलिस सब-इन्स्पेक्टर सनीथ सी. यांनी सांगितले, ‘एकही दागिना गायब नव्हता. असे वाटते की चोराने पश्चात्ताप किंवा भीतीमुळे दागिने परत केले असावेत.’ फिंगरप्रिंट टीमने बॅग आणि दागिन्यांवरून नमुने गोळा केले आहेत आणि कुटुंबातील सर्व सदस्यांचेही नमुने घेतले जात आहेत.
