भावपूर्ण श्रद्धांजली ! आधी व्हॉट्सअप स्टेट्सवर पत्नीला वाहिली श्रद्धांजली अन् नंतर.. परभणीत नेमकं काय घडलं?
वाघी येथे राहणाऱ्या विजय राठोड याचं सोनपुर तांडा येथील विद्याशी लग्न झालं होतं. 3 ते 4 दिवसांपूर्वी विद्या आणि विजय यांच्या कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. पण..

अवघ्या 2 दिवसांपूर्वी गणेशोत्सवाला सुरूवात झाली. घरोघरी वाजत-गाजत गणराय आले, सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. गावागवातील लोकं गणपती भक्तीत तल्लीन असताना परभणीमध्ये मात्र अत्यंत हादरवणारी आणि आनंदाच्या वातावारण मिठाचा खडा टाकणारी अशी एक भयानक घटना उघडकीस आली आहे. आधी व्हॉट्सअपवर पत्नीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहणारं स्टेटस ठेऊन एका पतीने त्याच्याच अर्धांगिनीची, पत्नीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादाय प्रकार घडला आहे. परभणीच्या जिंतुर तालुक्यातील सोनपुर तांडा येथे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घुणपणे खून केल्याने प्रचंड खळबळ माजली असून आरोपीला अटक करण्याची सर्व स्तरांतून मागणी होत आहे. विजय राठोड असे आरोपी पतीचे नाव असून विद्या असं मृत विवाहीत महिलेचे नाव आहे. सणासुदीच्या काळातच पतीने पत्नीची केलेली ही हत्या सर्वांनाच हादरवणारी असून त्यामुळे सगळेच हळहळत आहेत.
नेमकं काय झालं ?
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतुर तालुक्यातील सोनपुर तांडा येथे हा प्रकार घडला. जिंतूर तालुक्यातील वाघी येथे राहणाऱ्या विजय राठोड याचं सोनपुर तांडा येथील विद्याशी लग्न झालं होतं. 3 ते 4 दिवसांपूर्वी विद्या आणि विजय यांच्या कोणत्या तरी कारणावरून वाद झाला होता. पती-पत्नीतील या भांडणानंतर विद्या ही तिच्या माहेरी रहायला गेली होती.
मात्र काल विद्या ही तिच्या वडिलांच्या शेतात होती, तेव्हाच तिचा पती विजय पुन्हा तिथे आला. आणि त्यांच्या पुन्हा वाद, शाब्दिक चकमक झाली. संतापाच्या भरात विजय याने त्याच्या हातात असलेल्या धारदार हत्याराने पत्नी विद्यावर हल्ला केला, तिची छाती, पोट, पाठ यावर हत्याराने 10 ते 12 सपासप वार केले. यामुळे विद्या गंभीर जखमी होऊ रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. कुटुंबियांनी आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तिला उपचारांसाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद पारवे यांनी विद्या हिला तपासले आणि मृत घोषित केले.
स्टेटस ठेवून केला खून
विद्याच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबियांवर तर दु:खातचा डोंगर कोसळला. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. विद्याची निर्घृण हत्या करणाऱ्या तिच्या पतीला तत्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणूी कुटुंबियांनी केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे विद्याला मारण्यापूर्वी विजय याने त्याच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहीलेलं स्टेटस ठेवले होते. त्याने असं का केलं, पत्नीला का मारलं याचा पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे.
