कुख्यात गुंडांची टोळी, कमी किंमतीत सोनं देतो सांगून नकली नाणे द्यायचे, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, जंगलात थरार

कुख्यात गुंडांची टोळी, कमी किंमतीत सोनं देतो सांगून नकली नाणे द्यायचे, पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन, जंगलात थरार
गुंडांची दादागिरी, सोन्याचे खोटे नाणे देवून व्यवसायिकांची लूट, शंभर पोलिसांचा फौजफाटा, भर जंगलात थरार

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देऊन गंडविणारी टोळी सक्रीय होती. या टोळीचा पोलिसांनी नायनाट केला (Buldhana Police arrest notorious gangsters by Combing operation in Jungle)

चेतन पाटील

|

May 12, 2021 | 4:59 PM

बुलढाणा : सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष देऊन सौदा ठरविणाऱ्या आणि सौद्यानंतर ग्राहकांना मारहाण करणाऱ्या टोळीला मागील आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विभागीय पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींची चौकशी केली असता पोलिसांच्या हाती आणखी धागेदोरे लागले. पोलिसांनी त्या माहितीच्या आधारे आज (12 मे) पुन्हा तालुक्यातील जंगल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबविलं. यात दोन अट्टल गुन्हेगार पकडण्यात आले. पोलिसांना त्यांच्याकडून एक देशी पिस्तूल, नकली सोन्याच्या गिन्या, मोबाईल, तलवारींसह मोठा शस्त्र साठामिळाला. पोलिसांनी सर्व साठा जप्त केला आहे. विशेष म्हणजे 20 अधिकारी, दोन आरसीबी पथक, 50 अंमलदार असा मोठा ताफा घेवून ही कारवाई करण्यात आली (Buldhana Police arrest notorious gangsters by Combing operation in Jungle).

नेमकं प्रकरण काय?

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अंत्रज येथे सोन्याची नकली नाणी कमी किंमतीत देऊन गंडविणारी टोळी सक्रीय होती. या संघटीत टोळीद्वारे राज्यातील अनेकांना गंडविण्यात आले. टोळीतील आरोपी कमी किंमतीत सोन्याची नाणी देण्याचा सौदा ठरवायचे. पण ते नकली नाणी द्यायचे. तसेच सौदा ठरल्यानंतर संबंधितांना अंत्रज शिवारात बोलवायचे. त्यानंतर ते ग्राहकांकडील रक्कम आणि ऐवज लुटायचे (Buldhana Police arrest notorious gangsters by Combing operation in Jungle).

पुण्याच्या दोन व्यवसायिकांना लुबाडलं

संबंधित टोळीने 5 मे रोजी पुणे येथील दोन व्यवसायिकांची अशीच फसवणूक केली. याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे आणि माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी अंत्रज येथे कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या धडक कारवाईत टोळीतील 15 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन देशी कट्टे, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

आरोपींकडून 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या या आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार आज अंत्रज, हिवरखेड, रोहणा, कंझारा या भागातील जंगलात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात आणखी दोन जण ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्यावर आधी सुद्धा गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक देशी पिस्तूलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, मोबाईल, नकली सोने चांदी असा 3 लाखांवर मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

VIDEO : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी, पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यास बेदम मारहाण, सीसीटीव्हीत घटना कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें