राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झालाआहे. NCP MLA Anna Bansode

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
Anna Bansode
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:58 AM

पुणे: पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे ( Anna Bansode) यांच्यावर गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे. ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. एका व्यक्तीनं केलेल्या गोळीबारात  कोणीही जखमी झालेलं नाही. (Pune Pimpari Chinchwad unknown person fired on NCP MLA Anna Bansode)

अण्णा बनसोडे गोळीबारातून वाचले

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर आज दुपारी गोळीबार झाला. मात्र, या घटनेत कोणालाही जखम झालेली नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारासल घडली.

अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार का झाला?

आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र, यामध्ये कोणालाही जखम झालेली नाही.

गोळीबारावर अण्णा बनसोडे काय म्हणाले?

अण्णा बनसोडे यांनी अँथनी नावाच्या ठेकेदाराला वार्डातील दोन मुलांना कामाला लावं म्हणून सांगितलं होतं. त्यावेळी तो अरेरावी पद्धतीनं बोलला. सकाळी तो आला त्याच्यासोबत त्याचा मेव्हणा होता. त्या व्यक्तीनं गोळीबार केला. मात्र, या प्रकरणामागे नेमकं काय आहे हे पोलिसांनी तपास केल्यानंतर समोर येईल, असं अण्णा बनसोडे म्हणाले. पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती आहे.

अण्णा बनसोडे कोण आहेत?

राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे हे 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यापुर्वी ते 2009 मध्ये देखील निवडून आले होते. अण्णा बनसोडे यांनी 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचा 16 हजार 856 मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये अण्णा बनसोडे यांचा गौतम चाबुकस्वार यांनी 2 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी पिंपरी मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता.

आमच्यासाठी दादा हेच मुख्यमंत्री

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये अजित पवारांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असताना तुम्हाला कोणतं पद मिळणार? असा प्रश्न अण्णा बनसोडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अण्णा बनसोडे “अरे आमच्यासाठी दादा हेच मुख्यमंत्री आहेत” , असं म्हणाले होते. अण्णा बनसोडे अजित पवार समर्थक आमदार मानले जातात.

संबंधित बातम्या: 

“आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री”

लसीकरण मोहीम आणि मुख्यमंत्र्यांच्या संवाद शैलीवर भातखळकरांची खोचक टीका

(Pune Pimpari Chinchwad unknown person fired on NCP MLA Anna Bansode)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.