“आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री”

राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी 'राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री' असे वक्तव्य केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-विर्तकांनी उधाण आलं (Anna bansode on ajit pawar) आहे.

आमच्यासाठी अजित पवार हेच मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Dec 23, 2019 | 11:22 PM

पुणे : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार (Anna bansode on ajit pawar) लवकरच होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी अनेक आमदारांनी जोरदार लॉबिंग सुरु केली आहे. या दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी ‘राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हेच आमच्यासाठी मुख्यमंत्री’ असे वक्तव्य केलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात तर्क-विर्तकांनी उधाण आलं (Anna bansode on ajit pawar) आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला पत्रकरांनी अण्णा बनसोडे यांना तुम्हाला त्या 80 तासांत पवार कुटुंबियांकडून काय शिकायला मिळालं? महाविकासआघाडी सरकारमध्ये अजित पवारांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा असताना तुम्हाला कोणतं पद मिळणार? असे प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना अण्णा बनसोडे म्हणाले, “अरे आमच्यासाठी दादा हेच मुख्यमंत्री आहेत.” बनसोडे यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले (Anna bansode on ajit pawar) आहे.

महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी अजित पवार यांनी रातोरात भाजपशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामुळे राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता. त्यांना राष्ट्रवादीतील काही आमदारांना पाठिंबा दिला होता. त्यात अण्णा बनसोडे यांच्या नावाचाही समावेश होता.

तसेच सत्तास्थापनेसाठी राज्यपालांना दिलेल्या पाठिंबा पत्रावर आमदार अण्णा बनसोडे, आमदार धर्मारावबाबा आत्रम आणि स्वतः अजित पवार यांच्या सह्या नसल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली होती. दरम्यान बनसोडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे (Anna bansode on ajit pawar) राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.