Stamp and land scam | दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा, दीड कोटींचा भूखंड घोटाळा करणाऱ्या ‘नव्या तेलगीला’ बेड्या

मुद्रांक घोटाळ्यात बनावट मुद्रांक, शिक्के, यासह इतर खोटे दस्तऐवज करून तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचे समोर आले होते. (buldhana pradeep rathi stamp land scam)

Stamp and land scam | दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा, दीड कोटींचा भूखंड घोटाळा करणाऱ्या 'नव्या तेलगीला' बेड्या
बुलडाणा स्टॅम्प आणि भूखंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रदीप राठी याला पोलिसांनी अटक केली.

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव येथील बहुचर्चित बनावट मुद्रांक आणि भूखंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी प्रदीप राठी ( Pradeep Rathi) याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या मुद्रांक घोटाळ्यात (stamp scam) बनावट मुद्रांक, शिक्के, यासह इतर खोटे दस्तऐवज करून तब्बल 1 कोटी 64 लाख रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचे समोर आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर मुख्य आरोपी प्रदीप राठी मागील दोन महिन्यांपासून फरार होता. त्याला आता आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केलीय. (buldhana rural police arrested main accused Pradeep Rathi of stamp and land scam)

नेमके प्रकरण काय?

बुलडाणा जिल्ह्यातील तेलगी समजला जाणारा प्रदीप राठी हा घरीच बनावट मुद्रांक, विविध अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के तसेच इतर दस्तऐवज आणि स्वाक्षरी करून खोटे खरेदीखत तयार करत असल्याचे समोर आले होते. हा प्रकार लवलेश सोनी यांच्या मृत्यूनंतर उजेडात आला होता. लवलेश सोनी यांच्या मृत्यूनंतर 2007 ते 2021 दरम्यान त्यांच्या मालकीचे 14 प्लॉट परस्पर विक्री केले होते. ही बाब लक्षात येताच लवलेश सोनी यांच्या पत्नीने सर्व मूळ कागदपत्रांसह खामगाव शहर पोलीस ठाण्यात प्रदीप राठी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

आरोपी पाहुण्यांच्या घरी लपून बसला होता

त्यानंतर 1 कोटी 64 लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी प्रदीप राठी याच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल करुन खामगाव पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले होता. मात्र, या कालावधीत मुख्य आरोपी प्रदीप राठी दोन महिन्यांपासून फरार होते. दरम्यान त्याने खामगाव येथील जिल्हा सत्र न्यायालय आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम जामीनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हा आणि मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला होता.

राठीला कसे पकडले?

दरम्यान, दोन महिन्यांपासून पोलीस प्रदीप राठी याच्या मागावर होते. त्यानंतर हा आरोपी अकोला येथे नातेवाईकांच्या घरी लपलेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ सापळा रचत प्रदीप राठी याला अकोला ताब्यात घेतले. त्याची बुलडाणा येथे कोरोना चाचणी करण्यात आलीये. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आरोपी राठी याच्या अटकेनंतर आता पोलीस तपासात अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. हा बनावट मुद्रांक तयार करण्याचा घोटाळा 1 कोटी 64 लाखापेक्षा कितीतरी मोठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

इतर बातम्या :

नाशिकमधील ‘नवा तेलगी’ अखेर अटकेत, मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी बापू वाघला बेड्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI