AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमधील ‘नवा तेलगी’ अखेर अटकेत, मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी बापू वाघला बेड्या

नाशिक पोलिसांनी बनावट मुद्रांक प्रकरणातील मुख्य आरोपी बापू वाघ याला अटक केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बापू वाघच्या अटकेनंतर या घोटाळ्यातील अन्य बाबीही आता पुढे येण्याची शक्यता आहे.

नाशिकमधील 'नवा तेलगी' अखेर अटकेत, मुद्रांक घोटाळ्यातील मुख्य आरोपी बापू वाघला बेड्या
| Updated on: Mar 10, 2021 | 10:45 PM
Share

नाशिक : जिल्ह्यात पुन्हा एकदा स्टॅम्प घोटाळ्यानं डोकं वर काढलं आहे. नाशिकमध्येच 2000 मध्ये स्टॅम्पपेपरचा तेलगी घोटाळा समोर आला होता. सुरुवातीला या घोटाळ्याची व्यापी कमी वाटत होती. पण नंतर तो राज्यभरात पसरल्याचं आणि त्यात कोट्यवधी रुपयांचा घोटाला झाल्याचं समोर आलं. असाच एक नवा तेलगी नाशिकमध्ये निर्माण होऊ पाहत होता. पण नाशिक पोलिसांनी बनावट मुद्रांक प्रकरणातील मुख्य आरोपी बापू वाघ याला अटक केली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बापू वाघच्या अटकेनंतर या घोटाळ्यातील अन्य बाबीही आता पुढे येण्याची शक्यता आहे.(Police arrest Bapu Waghla, main accused in Nashik stamp scam)

घोटाळा उघड कसा झाला?

भास्कर निकम नावाची एक व्यक्ती वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलोपार्जित जमिनीवर नाव नोंदरणी करण्यासाठी गेले. त्यावेळी एक धक्कादायक माहिती उजेडात आली. त्यांची जमीन परस्पर विकली गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. एकाच क्रमांकाच्या 2 स्टॅम्पवर ही विक्री करण्यात आली होती. त्यानंतर भास्कर निकम यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केला. पोलिसांनीही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत तात्काळ तपास सुरु केला. दरम्यान, संशयित स्टॅम्प विक्रेता फरार झाला. स्टॅम्प विक्रेता आणि दुय्यम निबंधक कार्यालय, फेरफाराची नोंदणी करणारे तलाठी कार्यालयात वावर असलेल्या स्टॅम्प विक्रेत्यानं हा घोटाळा केल्याचं स्पष्ट धालं. अनेक वर्षांपासून कोणताही व्यवहार, नोंद नसलेल्या जमिनीची माहिती हा स्टॅम्प वेंडर तलाठी कार्यालयातून मिळवायचा. बनावट शिक्के आणि बनावट स्टॅपचा वापर करुन खोटे खरेदीखत तयार करायचा आणि त्याची झेरॉक्स प्रत देऊन नोंदणीही करुन घ्यायचा. काही दिवसांत या जमिनीचा उतारा घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयात याच जमिनीची विक्रीही करायचा.

देवेंद्र फडणवीसांकडून विधानसभेत मुद्दा उपस्थित

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 293 च्या प्रस्तावावर चर्चा करताना विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. आधीच्या तेलगी घोटाळ्याची आठवण करुन देत त्याच प्रकारचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला. गोटू वाघ नावाचा दुय्यम निबंधक हा खऱ्या अर्थाने या घोटाळ्याचा सूत्रधार आहे. मुद्रांक शुल्क कार्यालयातून जुन्या खरेदीखताच्या प्रत काढून त्यावर सत्यप्रत असे शिक्के मारले जात आहेत. खरेदी खतावरील क्रमांक काय ठेवून त्यात फेरबदल करुन कोट्यवधी रुपयांची मालमत्ता गोटू वाघने स्वत:च्या आणि इतरांच्या नावावर केल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

आतापर्यंत 50 हजाराहून अधिक खरेदी खत वापरुन मालमत्ता हडपण्यात आल्या आहेत. यात मुद्रांक अधिकारीही सहभागी आहे. ऑनलाईन दुरुस्त्या करुन कोट्यवधींची संपत्ती विकली जात आहे. हा नवा तेलगी घोटाळा असून त्याची कसून चौकशी केल्यास मोठा घोटाळा समोर येण्याची शक्यता असल्याचं फडणवीस म्हणाले. त्याचबरोबर दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

इतर बातम्या :

कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी मोठा निर्णय; नाशिकमध्ये 15 तारखेनंतर लग्नसमारंभांना परवानगी नाही

नाशिक स्थायी समिती सभापती निवडणूक, भाजपची ‘मविआ’ला धोबीपछाड, चाव्या पुन्हा गीतेंकडेच

Police arrest Bapu Waghla, main accused in Nashik stamp scam

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.