AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : काळ आला होता पण वेळ नाही, जालन्यात पुलावरुन जाताना बस नदीत कोसळली, गावकऱ्यांनी 23 प्रवाशांचे प्राण वाचवले

जालना जिल्ह्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) रात्री एक भयानक घटना घडली. रात्रीच्या अंधारात पुलावर पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने 23 प्रवाशांनी भरलेली बस थेट कसुरा नदीत कोसळली.

VIDEO : काळ आला होता पण वेळ नाही, जालन्यात पुलावरुन जाताना बस नदीत कोसळली, गावकऱ्यांनी 23 प्रवाशांचे प्राण वाचवले
पुलावरुन जाताना बस नदीत कोसळली, गावकऱ्यांनी 23 प्रवाशांचे प्राण वाचवले
| Edited By: Chetan Patil | Updated on: Sep 23, 2021 | 10:01 PM
Share

जालना : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत  आहे. पावसामुळे अनेक नद्या दुथळी भरुन वाहत आहेत. दरम्यान, जालना जिल्ह्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) रात्री एक भयानक घटना घडली. रात्रीच्या अंधारात पुलावर पाणी साचले होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने 23 प्रवाशांनी भरलेली बस थेट कसुरा नदीत कोसळली. पण स्थानिक गावकरी आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरीक आणि पोलिसांनी बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप वेळेत बाहेर काढले. त्यामुळे 23 प्रवाशांचा जीव वाचला.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही परतूर आष्टी रोजवर श्रीष्टी परिसरात घडली. पुलावरुन बस जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने बस थेट कसुरा नदीत कोसळली. विशेष म्हणजे याच नदीत दुपारी एक तरुण वाहून गेला होता. पण सुदैवाने त्याला पोहता येत असल्याने त्याचे प्राण वाचले होते. त्यानंतर रात्री याच पुलावरुन प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आल्याची माहिती एपीआय शिवाजी नागवे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना दिली.

रात्र असल्याने बचाव कार्यात अडथळा

नदीत बस कोसळ्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पुलाखाली बस कोसळल्याची बातमी वाऱ्यासारखी आजूबाजूच्या परिसरात पोहोचली. पोलीस, स्थानिक नागरीक तातडीने घटनासथळी दाखल झाले. पोलीस प्रशासन आणि स्थानिकांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकून सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढलं. विशेष म्हणजे रात्र असल्याने बचाव कार्यात अडथळा येत होता. पण स्थानिक आणि पोलिसांनी मोठ्या शर्तीने प्रयत्न करत सर्व प्रवासांना बाहेर काढले.

घटनेचा थरार बघा :

राज्यात पाच दिवसात कोणत्या जिल्ह्यात कधी व कसा पाऊस?

दिनांक 23 सप्टेंबरः परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 24 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 25 सप्टेंबर: परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 26 सप्टेंबर: जालना, परभणी, नांदेड, लातूर व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

दिनांक 27 सप्टेंबर: औरंगाबाद, जालना व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे,

ही माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. के.के, डाखोरे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

वाढदिवशीच पेट्रोल टाकून जिवंत जाळले, धारुर घाटात अर्धवट जळालेला तरुण पाहून खळबळ, बीड हादरलं

100 महिला-मुलींना लग्नासाठी गंडवणारा अटकेत, पिंपरी चिंचवडच्या लखोबा लोखंडेचे चक्रावून टाकणारे प्रताप

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...