वर्ध्यात शेतकरी नेत्यांची सभा घेणाऱ्या आयोजकांवर गुन्हा, जमावबंदीच्या आदेशाला डावलून शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी

जमावबंदीचे आदेश असतानाही याठिकाणी शेकडो कार्यकर्ते जमले होते.

वर्ध्यात शेतकरी नेत्यांची सभा घेणाऱ्या आयोजकांवर गुन्हा, जमावबंदीच्या आदेशाला डावलून शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी
Wardha Samnvay Committee

वर्धा : शेतकरी नेत्यांची सभा घेणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Case Filed Against Wardha Samnvay Committee). वर्ध्याच्या बजाज चौकात शनिवारी शेतकरी नेत्यांची सभा घेण्यात आली होती. जमावबंदीचे आदेश असतानाही याठिकाणी शेकडो कार्यकर्ते जमले होते (Case Filed Against Wardha Samnvay Committee).

दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वर्ध्याच्या बजाज चौकात मागील 68 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. शेतकरी कामगार आंदोलन समन्वय समितीच्या वतीने वर्ध्यात हे आंदोलन सुरु आहे. शनिवारी (20 फेब्रुवारी) या आंदोलन मंडपाला भेट देण्याकरिता शेतकरी नेते राकेश टिकेत येणार होते.

Wardha Samnvay Committee

Wardha Samnvay Committee

याकरिता समन्वय समितीकडून सभेची परवानगी मागितली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात जामवबंदी आदेश लागू करण्यात आले. यामुळे वर्धा शहर पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली. या सभेला टिकेत उपस्थित झाले नाहीत.

मात्र, त्यांचे सहकारी येथे दाखल झाले. परवानगी नसतानाही बाईक रॅली काढत या ठिकाणी सभा घेण्यात आली. यामुळे वर्धा शहर पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

Wardha Samnvay Committee

Wardha Samnvay Committee

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. संचारबंदी असतानाही वर्धा शहराच्या मुख्य मार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली. सोबतच शेकडो लोकांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली (Case Filed Against Wardha Samnvay Committee).

नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शहर पोलिसांनी कलम 188, 269 भांदवी सहकलम 51(बी) आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा वर्धा कामगार शेतकरी आंदोलन कृती समितीचे अविनाश काकडे, अनिल जवादे, नीरज गुजर, मंगेश शेंडे, गजेंद्र सुरकार, श्रीकांत तराळ यांच्यावर दाखल करण्यात आला आहे.

Case Filed  Against Wardha Samnvay Committee

संबंधित बातम्या :

केंद्र सरकारने काही केलं तरी विरोध करायचा ही फॅशन; शेतकरी आंदोलनावर भडकले ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन

Farmer Protest : सलग 17 दिवस सायकल चालवत ओडिशातून गाझीपूर बॉर्डरवर, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती कोण?

…तर दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातून बळ देऊ, नाना पटोले अ‍ॅक्शन मोडमध्ये

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI