Chandrapur : दहशत माजवणाऱ्यांच्या तळपायावर फटके देत सगळी मस्ती उतरवली! पोलिसांची दबंग कारवाई

Chandrapur Police Action: मारामाऱ्या करणं, दुचाकींची मोडतोड करणं, शस्त्रांचा धाक दाखवून महिला आणि मुलींना त्रास देणं, अशा गोष्टींनी संपूर्ण गाव त्रस्त झालेलं. या गावगुंडांविरोधात कारवाई (Police action) करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

Chandrapur : दहशत माजवणाऱ्यांच्या तळपायावर फटके देत सगळी मस्ती उतरवली! पोलिसांची दबंग कारवाई
दबंग कारवाई करताना चंद्रपूर पोलिसImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 7:56 AM

चंद्रपूर : चंद्रपूर पोलिसांनी (Chandrapur Police) दहशत माजवणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तलवारींचा धाक दाखवून काही जण गावातील लोकांना त्रास देत होते. मारामाऱ्या करणं, दुचाकींची मोडतोड करणं, शस्त्रांचा धाक दाखवून महिला आणि मुलींना त्रास देणं, अशा गोष्टींनी संपूर्ण गाव त्रस्त झालेलं. या गावगुंडांविरोधात कारवाई (Police action) करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. अखेर पोलिसांनी स्थानिकांची विनंती ऐकून गावाकडे धाव घेतली आणि दहशत माजवणाऱ्या गुंडंना अद्दल घडवली आहे. चंद्रपूर शहराच्या जवळच असलेल्या जुनोना गावात (Junona Village in Chandrapur) पोलिसांनी या गावगुंडाना धडा शिकवलाय. या गावगुंडाना गुडघ्यावर बसवून ग्रामस्थांची माफी मागायला लावली. त्याआधी दहशत माजवणाऱ्या गावगुडांच्या तळपायावर पोलिसांनी फटकेही दिले. यानंतर दोघेही गावगुंड रडकुंडीला आले होते.

तलवारीचा धाक दाखवून गुंडगिरी

चंद्रपूर शहरालगतच्या जुनोना गावात हे गावगुंड दहशत माजवत होते. गेले काही महिने तलवारींचा धाक दाखवून या भागात मारहाण आणि दुचाकी मोडतोड यासारखे प्रकार या गुंडांनी चालवले होते. शस्त्राच्या बळावर महिला आणि मुलींनाही हे गुंड त्रास द्यायचे .याबाबत स्थानिकांनी धाडस दाखवत पत्रकार परिषदही घेतली होती. आणि स्थानिक रामनगर पोलीस ठाण्यात पोचत पुन्हा एकदा पोलीस कारवाईची विनंती केली होती.

दोघांना अटक

पोलिसांनी ग्रामस्थांची दखल देत गावात दहशत माजविणाऱ्या विक्रम टाक आणि नंदू बानस्कर या दोन गुंडांना अद्दल घडवली. आधी पोलिसांनी ग्रामस्थांसमोर या दोघाही गुंडांना चोप दिला. त्यानंतर आपल्या कृत्याची माफी मागायला लावून या दोघांनाही अटक केली. दरम्यान, तातडीने कारवाई केल्याने जुनोनावासियांनी पोलिसांचे आभार मानलेत.

दबंग कारवाई

यावेळी गावगुंड पोलिसांच्या दबंग कारवाईनं चांगलेत बिथरले होते. गावकऱ्यांनी रडत रडत या दोघांनीही माफी मागितली आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी आता अटक करण्यात आलेल्या दोघांवरही कडक कारवाई केली जावी, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतीत असलेलं गाव अखेर आता पुन्हा मोकळा श्वास घेणार आहे. पोलिसांननी केलेल्या या कारवाईमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

तेरवीचा कार्यक्रम करुन परतत होते पारखी कुटुंब, जनावर आडवे आले अन् …वाचा नेमके काय घडले ?

भद्रावतीत सापडला होता मुंडकं नसलेला नग्नावस्थेतील युवतीचा मृतदेह, युवती रामटेकची असल्याची ओळख पटली

चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकाचे हल्लेखोर अटक, हटकल्याच्या रागातून केला होता हल्ला

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.