AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादेत ड्रग्जच्या साठ्यावर छापा , विक्रीसाठी आणलेल्या अवैध सिरप व गोळ्यासह एकाला अटक

पोलिसांनी केलेल्या कारवाईत कॉवर नावाचे सिरप, व ई स्कफ सिरपच्या एकूण 61 बाटल्या, तसेच अलप्रासेफ गोळ्यांच्या 12 स्ट्रीप आढळून आल्या. या सर्व औषधींची एकूण किंमत 7822.00 रुपये एवढी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

औरंगाबादेत ड्रग्जच्या साठ्यावर छापा , विक्रीसाठी आणलेल्या अवैध  सिरप व गोळ्यासह एकाला अटक
अवैधरित्या ड्रग्ज विक्री करणाऱ्या एकाला औरंगाबाद पोलिसांनी केली अटक.
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 2:11 PM
Share

औरंगाबाद: शहरात अवैधरित्या गुंगीकारक औषधी आणि नशेच्या गोळ्या विक्रीसाठी (illigal drugs and norcotics ) आणणाऱ्या एकाला सिटी चौक पोलिसांनी (Aurangabad city chauk police) अटक केली आहे. त्याच्याकडून मानवी शरीरासाठी अपायकारक औषधी जप्त करण्यात आली आहेत. शहरातील लेबर कॉलनी परिसरातील विश्वास नगरात पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

गुप्त बातमीदारामार्फत मिळाली माहिती

सिटी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची गस्त सुरु असते. यावेळी विशेष पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद यांना गुप्त बातमीदारामार्फत लेबर कॉलनीत अवैधरित्या गुंगीचे औषध विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या कॉलनीत एक इसम गुंगीकारक आणि मानवी शरीरासाठी घातक नशेच्या औषधी सिरप व गोळ्यांचा साठा असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना देण्यात आली.

लेबर कॉलनीत पोलिसांचा छापा

गुप्त बातमीदारानी दिलेल्या माहितीनुसार, लेबर कॉलनीत पोलिसांच्या पथकाने छापा मारला. लेबर कॉलनीतील विश्वास नगर येथील एस कृष्णराव यांच्या घरात राहणाऱ्या इसमाची झडती घेण्यात आली. या झडतीत औषधी सिरपच्या बॉटल व गोळ्यांच्या स्ट्रीप आढळून आल्या. सदर इसमाला या औषधी साठ्याचे बिल आहे का, अशी विचारणा केली असता, त्याने नाही, असे सांगितले. दरम्यान अवैधरित्या गुंगीकारक व नशेखोरीसाठीची औषधी बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी या इसमाला ताब्यात घेतले आहे. सदर इसमाचे नाव अरबाज ऊर्फ गुड्डू गणी देशमुख (27) असे आहे. त्याच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमधछ्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

एकूण 7822 रुपयांचा साठा जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत कॉवर नावाचे सिरप, व ई स्कफ सिरपच्या एकूण 61 बाटल्या, तसेच अलप्रासेफ गोळ्यांच्या 12 स्ट्रीप आढळून आल्या. या सर्व औषधींची एकूण किंमत 7822.00 रुपये एवढी असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात आणखी कुणाचा हात आहे, यासंबंधीचा तपास पोलीस उपनिरिक्षक कल्याण चाबुकस्वार व पोलीस असिस्टंट शेळके करत आहेत.

शहरात नशेबाजीचे प्रमाण वाढले..

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद पोलिसांतर्फे शहरातील विविध ठिकाणचे ब्रीजच्या खाली बसलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे. तसेच शहरातील विविध एकांताच्या ठिकाणी बसलेल्या तरुणांचीही झाडा-झडती घेतली जात आहे. अशा ठिकाणी नशा करणाऱ्या तरुणांची संख्याही जास्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. शहरात भीक मागणारी मुलेही सायंकाळच्या वेळी ब्रिजखाली नशा करताना आढळून आली आहेत. तसेच नशेच्या अंमलाखाली झालेल्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात अशा प्रकारे अवैधरित्या नशेबाजीची औषधं कोण पुरवतं, यामागे नेमका कोण सूत्रधार आहे, याचा तपास घेणं गरजेचं बनलं आहे.

इतर बातम्या- 

औरंगाबादकरांनो, लोडशेडिंगचे संकट घोंगावतेय.. 6 ते 10 या वेळेत जपूनच वीज वापरा, महावितरणचे आवाहन!

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.