Coimbatore | प्राध्यापकाकडून लैंगिक अत्याचार, कारवाईत चालढकल, हताश झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या

तामिळनाडूतील कोइंबतूर येथे 12 वीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीये. आई-वडील घराबाहेर गेले असताना अल्पवयीन मुलीने हे भयानक पाऊल उचलले आहे. पोलिसांनी मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. ज्यामध्ये तिने तीन लोकांची नावे लिहिली आहेत.

Coimbatore | प्राध्यापकाकडून लैंगिक अत्याचार, कारवाईत चालढकल, हताश झालेल्या विद्यार्थिनीची आत्महत्या
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:20 PM

कोइंबतूर : तामिळनाडूतील कोइंबतूर येथे 12 वीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीये. आई-वडील घराबाहेर गेले असताना अल्पवयीन मुलीने हे भयानक पाऊल उचलले आहे. पोलिसांनी मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट जप्त केली आहे. ज्यामध्ये तिने तीन लोकांची नावे लिहिली आहेत.

कोइंबतूर येथे राहणारी 17 वर्षीय मुलगी एका खाजगी शाळेत शिकत होती. ती बारावीची विद्यार्थिनी होती. तिने नुकतेच शाळेत जायला सुरुवात केली होती. पण अचानक ती शाळा सोडण्याबाबत बोलू लागली. तिला त्या शाळेत जायचे नव्हते. याच कारणामुळे त्याला शाळेतून टी.सीही मिळाली.

शिक्षकाने लैगिंग छळ केल्याचा आरोप

शुक्रवारी ती तिच्या खोलीत फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळली. पोलिसांनी झडती घेतली असता मुलीच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये तीन लोकांची नावे तिने लिहिली आहेत. मुलीच्या शाळेतील शिक्षक तिचा लैंगिक छळ करत असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. याबाबत तरुणीने तक्रारही केली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मुलीचे वडील म्हणाले, ‘माझ्या मुलीने प्राध्यापकाविरोधात तक्रार केली होती, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. मुख्याध्यापकांनीही त्यांची तक्रार गांभीर्याने घेतली नाही आणि त्या प्राध्यापकाने माझ्या मुलीला त्रास देणे सुरुच ठेवले’.

नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खासगी शाळेतील प्राध्यापकांविरुद्ध आयपीसीच्या दोन कलमांतर्गत पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध IPC च्या कलम अंतर्गत 306 आणि POCSO कायद्याच्या कलम 9L R/W कलम 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

भारतीय अष्टपैलू खेळाडू आणि BCCI अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप, अंडरवर्ल्ड गँगस्टरच्या पत्नीची तक्रार

Jharkhand Crime | आधी गळा चिरला, मग दगडाने चेहरा ठेचला, झारखंडमध्ये महिलेची निर्घृण हत्या

Non Stop LIVE Update
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.