AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्यांदा पोलिसांचं काऊन्सिंग ऐकलं अन् बाहेर येताच एकमेकांच्या अंगावर तुटून पडले, जळगावात SP ऑफिससमोर राडा

जळगाव एस पी कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबियांमध्ये शुक्रवार 16 जुलै रोजी कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. (Conflict in the SP office premises)

पहिल्यांदा पोलिसांचं काऊन्सिंग ऐकलं अन् बाहेर येताच एकमेकांच्या अंगावर तुटून पडले, जळगावात SP ऑफिससमोर राडा
जळगावात SP ऑफिससमोर राडा
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 10:23 AM
Share

जळगाव :  एस पी कार्यालयाच्या आवारात दोन कुटुंबियांमध्ये शुक्रवार 16 जुलै रोजी कौटुंबिक वादातून हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला. यावेळी एलसीबीचे कर्मचारी व महिला दक्षता समितीच्या कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

नेमका काय प्रकार झाला?

या प्रकरणी जिल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, पैठण येथील गणेश गिरी याचा विवाह जामनेर तालुक्यातील वाकोद येथील बरखा गणेश गिरी या मुलीशी चार महिन्यापूर्वी झाला होता. दोन महिने सुखी संसार झाल्यानंतर दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. नवऱ्याने घर जावई व्हावे यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. त्यामुळे मुलगी बरखा ही जामनेरला आई-वडिलांकडे निघून आली. याप्रकरणी महिला दक्षता समितीमध्ये तक्रार करण्यात आली. दोन्ही कुटुंबातील परिवार एस पी कार्यालयाच्या ठिकाणी तारखेवर आले होते. त्यावेळी हेड कॉन्स्टेबल मनीषा पाटील, अभिलाषा मनोरे, संगीता पवार यांनी दोन्ही कुटुंबांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना कौन्सिलिंग केले.

दोन्ही परिवार कार्यालयातून बाहेर पडल्यावर तुफान हाणामारी झाली. यात गणेश गिरी व बरखाचे मामा हे जखमी झाले यावेळी एलसीडी चे कर्मचारी व महिला पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती जिल्हा पोलिस ठाण्यात कळविण्यात आल्याचे महिला दक्षता समितीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

(Conflict in the SP office premises, a fight between two families over a family dispute in jalgaon)

हे ही वाचा :

कंपनीचा 20 लाखांचा चेक चोरुन पैसे लंपास, मिरजेत शिवसेना शहर प्रमुखाला अटक

अनिल देशमुखांच्या पत्नी चौकशीला हजर राहिल्या नाही, पण वकिलामार्फत ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर

भिवंडीत अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने चिमुरड्याची अपहरण करून हत्या

29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.