बायकोवर 45 वेळा चाकूने वार, एकटक पाहातच राहिला नवरा.., त्यानंतर अत्यंत भयानक सत्य समोर…
Crime : असा नवरा नसलेला बरा..., खोटं सांगून बायकोला बाहेर नेलं, बायकोवर चाकून वार होतायेत तरी, तो एकटक पाहातच राहिला, त्यानंतर समोर आलेलं सत्य होतं अत्यंत भयानक... याप्रकरणी पोलीस करत आहेत कसून चौकशी...

Crime : 21 सप्टेंबर रोजी एक धक्कादायक घटना समोर आली. मध्ये प्रदेश येथील खंडवा येथे एका महिलेवर 40 – 45 वेळा चाकूने वार केले. मध्यरात्री एका जोडप्याला पहिल्यांदा लुटण्यात आलं त्यानंतर महिलेची हत्या करण्यात आली. घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. पण जेव्हा घटनेचं सत्य समोर आलं तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसला. नवऱ्याने बायकोची हत्या करण्यासाठी कट रचला. त्याने बायकोची सुपारी दिली. अखेर पोलीस चौकशीत अत्यंत मोठी घटना समोर आली आहे.
महिलेची हत्या करण्यासाठी मारेकऱ्यांनी क्राईम पेट्रोलचे अनेक भाग पाहिले होते. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी पतीसह तिघांना अटक केली आहे. तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे. तिसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस आहे. तिन्ही आरोपी महिलेच्या पतीचे मित्र असल्याचं सांगण्यात येत आहे.
पदम नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दिग्रिस गावात ही घटना घडली. रविवारी मध्यरात्री एका महिलेवर चाकूने 40 ते 45 वार करून तिची हत्या करण्यात आली. खंडवा येथील एसपी मनोज कुमार राय यांनी सांगितल्यानुसार, या हत्येचा खटला सोडवण्यासाठी आम्ही दोन पोलिस पथके तयार केली. आम्ही सर्व सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन केले. त्यानंतर, हेमंत उर्फ कान्हा नावाच्या एका व्यक्तीवर संशय आला. कठोर चौकशी केल्यानंतर त्याने एक धक्कादायक गुपित उघड केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महिलेच्या नवऱ्याने एक लाख रुपये देऊन आम्हाला सुपारी दिली होती.. आर्यन आणि राजेंद्र नावाच्या व्यक्तीने मिळून धक्कादायक कृत्य केलं… पोलिसांना पुरावा म्हणून चाकू आणि सुपारी स्वरूपात दिलेले 10 हजार रुपये जप्त केले आहेत… एवढंच नाही तर, महिलेच्या पतीने दोन दिवसांपूर्वी मोबाईल फोन हरवल्याचं कुटुंबाला सांगितलं… त्यानंतर रविवारी पोटात दुखत असल्याचं सांगत बायकोला सोबत घेऊन रुग्णालयात निघाला…’
निर्जन ठिकाणी चाकूने वार
योजनेनुसार, ‘आरोपी बायकोला घेवून निर्जन स्थळी निघून गेला जेथे तीन मित्र देखील उपस्थित होते. त्यांनी अचानक हल्ला केला, त्यांनी दरोडा टाकत आहेत असं भासवलं. त्यानंतर आरोपींनी महिलेवर 40 – 45 वेळा वार केले… यामध्ये तिच्या नवऱ्याला सामान्य जखम झाली… पोलिसांनी डॉक्टरांना आरोपीच्या पोटदुखीबद्दल विचारलं तेव्हा तो पूर्णपणे ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
कबूल केला गुन्हा…
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र याने महिलेसोबत दुसरं लग्न केलं होतं. महेंद्र याने सांगितल्यानुसार, महिला सतत पतीला शिवीगाळ करायची… कुटुंबासोबत तिची वागणूक देखील योग्य नव्हती. अखेर त्रासलेल्या महेंद्र याने मित्रांसोबत मिळून बायकोची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी हेमंत उर्फ कान्हा , आर्यन आणि मुख्य आरोपी महेंद्र याला देखील अटक केली आहे. चौथा आरोपी सध्या फरार आहे… राजेंद्र याच्या शोधात पोलीस आहे. याप्रकरणी पोलीस सध्या कसून चौकशी करत आहेत.
