AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिव्ह इन पार्टनरकडून बलात्काराचा प्रयत्न, महिला पोलीस निरीक्षकाच्या आरोपांनी खळबळ

महिला पोलीस निरीक्षकाने तिच्या अधिकारांचा गैरवापर करत आपल्याला धमकावलं, आपल्याला अनैतिक कामं करण्यास भाग पाडलं, शारीरिक आणि मानसिक शोषणही केलं, असा उलट दावा आरोपी तरुणाने केला आहे.

लिव्ह इन पार्टनरकडून बलात्काराचा प्रयत्न, महिला पोलीस निरीक्षकाच्या आरोपांनी खळबळ
लिव्ह इन पार्टनरवर महिला पोलिसाचा आरोप
| Edited By: | Updated on: Aug 16, 2021 | 10:11 AM
Share

लखनौ : लिव्ह इन पार्टनरने आपल्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत महिला पोलिसाने खळबळ उडवून दिली आहे. उत्तर प्रदेशातील महराजगंज जिल्ह्यात संबंधित महिला पोलीस निरीक्षकाने आपल्या बॉयफ्रेण्डसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत असल्याचं बोललं जातं. मात्र महिलेनेच आपल्याला जबरदस्ती डांबून ठेवत खोट्या आरोपाखाली अडकवलं आहे, असा दावा विवाहित आरोपी तरुणाने केला आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत तपास सुरु केला आहे.

महिलेचा दावा काय?

कानपूरच्या संबंधित तरुणासोबत आपली जुनी ओळख आहे. त्याने आपल्या मोबाईलमधून एटीएम कार्डचा पिन नंबर घेतला. फसवून आपल्या खात्यातून दहा लाख रुपये काढले, असा आरोप महिलेने लिव्ह इन पार्टनरवर केला आहे. याचा जाब विचारल्यानंतर तो महराजगंजमधील घरी आला आणि छेडछाड करु लागला, असाही दावा तिने केला आहे.

यावेळी त्याने जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवण्याचाही प्रयत्न केला. मी आरडाओरडा करायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने ओढणीने माझा गळा आवळला. आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले, तेव्हा धमकी देऊन तो तिथून पळून गेला, असा आरोपही महिलेने तक्रारीत केला आहे.

आरोपीचा दावा काय?

महिला पोलीस निरीक्षकाने तिच्या अधिकारांचा गैरवापर करत आपल्याला धमकावलं, आपल्याला अनैतिक कामं करण्यास भाग पाडलं, शारीरिक आणि मानसिक शोषणही केलं, असा उलट दावा आरोपी तरुणाने केला आहे. आरोपीचं यापूर्वीच लग्न झालेलं आहे. महिला हवालदाराच्या त्रासाविषयी बडे पोलीस अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांकडेही तरुणाने ट्विटरवरुन दाद मागितली आहे.

उन्नावमध्ये असताना माझ्या पत्नीने माझी सुटका करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तक्रारदार महिला पोलीस निरीक्षकाने आपल्या पत्नीवरच मारहाणीचा आरोप करत गुन्हा दाखल केला. आपल्यासोबत न राहिल्यास बलात्काराचा खटला दाखल करुन अडकवेन, अशी धमकीही तिने दिल्याचा आरोप आरोपी तरुणाने केला आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

लिव्ह इन संबंधातून मूल, तरी पहिल्या नवऱ्याला घटस्फोटास नकार, तरुणाकडून विवाहित प्रेयसीची हत्या

प्रेमात यांच्या त्याग नाहीच? लिव्ह इन रिलेशनशिपनंतर वेगळं झाल्यावर तरुणाकडून किळसवाणं कृत्य

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.