लाईव्ह व्हिडीओत टॉर्चर, कुणावर बलात्कार, तर कुणाची तरी हत्या, फेमस होण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी काहीही धिंगाणा

प्रसिद्धी आणि पैसे कमावण्याच्या नादात काही लोक भरकटत आहेत (crime on youtube during live video streaming).

लाईव्ह व्हिडीओत टॉर्चर, कुणावर बलात्कार, तर कुणाची तरी हत्या, फेमस होण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी काहीही धिंगाणा
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : सोशल मीडिया हे आपल्या आयुष्याचं सध्या महत्त्वाचं घटक बनलं आहे. आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पैसेही कमवू शकतो. याशिवाय सोशल मीडियामुळे आपण रातोरात हिरो बनू शकतो. मात्र, प्रसिद्धी आणि पैसे कमावण्याच्या नादात काही लोक भरकटत आहेत. ते सोशल मीडियावर लाईव्ह करुन भयानक गुन्हे करत असल्याचं उघड झालं आहे. अशा काही गुन्ह्यांबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत (crime on youtube during live video streaming).

रशियात भयानक अवस्था

सध्या रशियात भयानक अवस्था आहे. तिथले यूट्यूबर्स कंटेटच्या नावाखाली काहीही करताना दिसत आहेत. ते यूट्यूबर लाईव्ह करतात किंवा रेकॉर्डेड व्हिडीओ अपलोड करतात. या व्हिडीओत खरंतर पाहण्यासारखं काहीच नसतं. या व्हिडीओजमध्ये ते इतर लोकांना टॉर्चर करतात, त्यांना छळतात, काही वेळेला तर जीवही घेतात. लोकांनी हे बघावं आणि सब्सक्राईबर्स वाढावेत फक्त याचसाठी ते याप्रकराचं कृत्य करतात. या व्हिडीओजवर आता रशिया सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे (crime on youtube during live video streaming).

यूट्यूबरने गर्लफ्रेंडला विविस्त्र करुन थंडीत पाठवलं

विशेष म्हणजे डिसेंबर 2020 मध्ये रशियातून एक भयानक घटना समोर आली होती. एका यूट्यूबरने त्याच्या ग्रर्लफ्रेंडला विविस्त्र बाल्कनीत ढकललं आणि बाल्कनीचा दरवाजा बंद केला. अखेर थंडीत कुडकुडून त्याच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू होता. हा संबंध प्रकार यूट्यूबरवर लाईव्ह होता.

बेघर व्यक्तीला जाळल्याचाही प्रकार

या भयानक ट्रेंडमुळे काही दिवसांपूर्वी एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. याशिवाय एका यूट्यूबरने तर एका बेघर व्यक्तीला जीवंत जाळल्याचा प्रकार समोर आला होता. याशिवाय याच महिन्यात एका यूट्यूबरने लाईव्ह स्ट्रीम करत एका महिलेला ड्रग्सच्या गोळ्या दिल्या आणि तिच्यावर बलात्कार केला.

यूट्यूबकडून या व्हिडीओजला विरोध

खरंतर यूट्यूबवर या गोष्टींसाठी परवानगी नाही. यूट्यूब अशा प्रकारचे व्हिडीओ तातडीने काढतं. याशिवाय यूजर्सला ब्लॉक केलं जातं. मात्र, तरीही काही लोक यूट्यूबपासून वाचण्यात यशस्वी होतात. काही यूजर्स तर टेलीग्राम सारख्या अॅपवर व्हिडीओ शेअर करतात.

हेही वाचा :

मित्राच्या गर्लफ्रेण्डला दारु पाजून बलात्कार, नागपुरात तरुणाला बेड्या