एवढं गोड गुबगुबीत पोर सोडताना काळीज कसं हललं नसेल? गोशाळेतली घटना CCTV मध्ये कैद

सोशल मीडियावर सध्या एका 11 महिन्यांच्या गुबगुबीत, गोड बाळाचा फोटो व्हायरल होतोय. या बाळाचे नेमके आई-वडील, नातेवाईक कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.

एवढं गोड गुबगुबीत पोर सोडताना काळीज कसं हललं नसेल? गोशाळेतली घटना CCTV मध्ये कैद
एवढं गोड गुबगुबीत पोर सोडताना काळीज कसं हललं नसेल? गोशाळेतली घटना CCTV मध्ये कैद

नवी दिल्ली : सोशल मीडियावर सध्या एका 11 महिन्यांच्या गुबगुबीत, गोड बाळाचा फोटो व्हायरल होतोय. या बाळाचे नेमके आई-वडील, नातेवाईक कोण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. खरंतर एक व्यक्ती हे बाळ काल (9 ऑक्टोबर) रात्री नऊ वाजेच्या सुमारास गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर शहरातील एका गोशाळे बाहेर बेवारसपणे ठेऊन गेली आहे. या बाळाचा रडण्याचा आवाज ऐकून तिथले स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्वप्रकार समोर आला. विशेष म्हणजे या बाळाला गोशाळेबाहेर सोडून जाणारा व्यक्ती कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. पोलीस त्या व्यक्तीचाही शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. जेव्हा स्थानिकांना या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस त्या बाळाला गांधीनगरच्या सिव्हिल रुग्णालयात घेऊन गेले. तिथे बाळाचे सर्व टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टचा रिपोर्टही लगेच समोर आला. सर्व टेस्ट या नॉर्मल आहेत. पोलीस बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. या दरम्यान परिसरातील एका महिलेने बाळाच्या आई-वडिलांचा तपास लागत नाही तोपर्यंत जबाबदारी स्वीकारली आहे. ती महिला सध्या बाळाचं पालनपोषण करत आहे.

पोलिसांकडून बाळाच्या आई-वडिलांचा शोध सुरु

पोलीस बाळाला गोशाळेबाहेर सोडून जाणाऱ्या इसमाचा शोध घेत आहेत. यासाठी त्यांनी 10 पेक्षाही जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचं पथक तयार केलं आहे. हे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलीस शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पण अद्याप बाळाच्या नातेवाईकांचा कुणाचाही पत्ता लागलेला नाही.

पोलिसांचं नागरिकांना आवाहन

पोलिसांना हे बाळ परकीय राज्यातून आलेल्या इसमाने गोशाळेबाहेर सोडल्याचा संशय आहे. पोलीस त्या दृष्टीकोनाने देखील तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत जेणेकरुन बाळाच्या आई-वडील किंवा नातेवाईकांची कुणाकडून तरी माहिती मिळावी. या बाळासंबंधित कोणतीही माहिती असेल तर कृपया पोलिसांशी संपर्क करावा, असं आवाहन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

पहाटे रिक्षातून येऊन पाच दिवसाच्या बाळाला रस्त्यावर सोडले

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या कल्याण शहरात देखील असाच एक प्रकार समोर आला होता. कल्याण मलंग रोडवरील चेतना शाळा परिसरात रस्त्यालगत भल्या पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. एक महिला सकाळीच रिक्षातून आली आणि तिने चेतना शाळेच्या परिसरात चार ते पाच दिवसांचा नवजात शिशू सोडून दिला आणि ती तिथून निघून गेली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. मानपाडा पोलिसांनी या बाळाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला होता. मात्र, या प्रकारामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली होती.

हेही वाचा :

कृषिमंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उपस्थितीत अल्पवयीन मुलीचं लावलं लग्न; भाजप नेत्या चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

जोडीदारासोबत लैंगिक समस्यांनी त्रस्त, त्याने थेट धारदार चाकूने स्वत:चं गुप्तांग कापलं, नेमकं प्रकरण काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI