‘थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी’ व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर हवा करणारे जेरबंद

इचलकरंजी शहरात व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी, बंदुकीचे व्हिडीओज ठेवून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत (Ichalkaranji police arrested Youth who share swords and guns videos on What's app status)

'थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी' व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर हवा करणारे जेरबंद
व्हाट्सअ‍ॅप स्टेटसवर हवा करणारे जेरबंद

इचलकरंजी (कोल्हापूर) : तरुणांमध्ये सध्या विचित्र क्रेझ सुरु झालीय. शहरात स्वत:ची दहशत निर्माण करण्यासाठी व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि बंदूकीचे व्हिडीओ ठेवून सर्वसामान्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातोय. इचलकरंजी शहरात अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांविरोधात पोलिसांनी मोहिमच सुरु केली आहे. जो तरुण अशाप्रकारे स्वत:ची क्रेझ निर्माण करण्याचा प्रयत्न करेल त्याच्याविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारात पोलिसांनी दिला आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. संबंधित कारवाई शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली आहे (Ichalkaranji police arrested Youth who share swords and guns videos on What’s app status).

व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवलेल्या व्हिडीओत नेमकं काय?

कोल्हापूर नाका परिसरात राहणारा शरद इलाज तसेच आंबेडकर नगरमधील शाहरुख कामडुगी यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शाहरुख कामडुगी या तरुणाने व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला भयानक व्हिडीओ शेअर केला होता. ‘थांबलास तर कोयता आणि पळालास तर गोळी, नाक्यावर फक्त आबांची टोळी’, असे शब्द या व्हिडीओत होते. तसेच व्हिडीओत तलवार, पिस्तूल हे देखील होते. याशिवाय बदला घेण्याबाबतही व्हिडीओत भाष्य करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे संबंधित व्हिडीओ एकाकडून दुसऱ्याला असे अनेकांकडे फॉरवर्ड करण्यात आला. तसेत अनेकांनी असे व्हिडीओ व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवले. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली.

व्हिडीओजची स्वत: डीवायएसपींकडून दखल

विशेष म्हणजे या व्हिडीओजची स्वत: डीवायएसपी बीबी महामुनी यांनी दखल घेतली. त्यांनी या व्हिडीओ प्रकरणी सर्वात आधी शाहरुखला ताब्यात घेऊन आधी चौकशी केली. यावेळी शाहरुखने आपण संबंधित व्हिडीओ व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला ठेवल्याची कबुली दिली. तसेच आपण हा व्हिडीओ त्याचा साथीदार नितीन स्वामी आणि आणखी इतरांना पाठवल्याची माहिती दिली. पोलिसांनी इतर तरुणांची देखील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

इचलकरंजीत दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले

इचलकरंजी शहरात व्हाट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी, बंदुकीचे व्हिडीओज ठेवून दहशत निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच यामुळे गुन्हेगारी देखील वाढल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस सर्वांची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांनी आरोपी शाहरुख विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे (Ichalkaranji police arrested Youth who share swords and guns videos on What’s app status).

पोलिसांचा कारवाई करण्याचा इशारा

अशाप्रकारचे व्हिडीओ ठेवणाऱ्या टोळीवर सायबर पोलिसाची करडी नजर ठेवण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारे कुणी व्हिडीओ ठेवल्याचे लक्षात आल्यानंतर थेट पोलिसांना माहिती द्या, असं आवाहन डीवायएसपी बी महामुनी यांनी शहरातील नागरिकांना केलं आहे. तसेच आरोपींना कडक समज देण्यात आली आहे. इथून पुढे अशाप्रकारे कृत्य केलं तर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

घराला कुलूप पाहून चोरट्यांनी संधी साधली, तब्बल 65 तोळे सोने आणि 42 हजार रोख रकमेवर डल्ला

VIDEO | वाळू तपासणी पथकातील महिला तलाठ्यावर भाजप नगरसेवकाचा हल्ला

Published On - 4:29 pm, Sun, 6 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI