पठ्ठ्याने PUBG नादात आईच्या खात्यातून 10 लाख उडवले, नंतर चिठ्ठी लिहून म्हणतो मी घरीच येणार नाही

नव्या युवा पीढिला ऑनलाईन गेमच्या व्यसनाने अगदी प्रभावित केलंय. या गेमच्या वेडापायी कोणकाय करेल याचा काही भरोसा राहिलेला नाही. असीच एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. एका 16 वर्षीय मुलाने पबजी गेमचा आयडी मिळवण्यासाठी थेट आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये ऑनलाईन उडवले.

पठ्ठ्याने PUBG नादात आईच्या खात्यातून 10 लाख उडवले, नंतर चिठ्ठी लिहून म्हणतो मी घरीच येणार नाही
Pubg Battlegrounds Mobile India
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 10:10 AM

मुंबई : नव्या युवा पीढिला ऑनलाईन गेमच्या व्यसनाने अगदी प्रभावित केलंय. या गेमच्या वेडापायी कोण काय करेल याचा काही भरोसा राहिलेला नाही. असीच एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. एका 16 वर्षीय मुलाने पबजी गेमचा आयडी (PUBG Game ID) मिळवण्यासाठी थेट आईच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये ऑनलाईन उडवले. या घटनेनंतर आईवडील रागावण्याच्या भीतीने या बहादराने आपण कायमचं घर सोडत आहे आणि परत घरी येणार नाही अशी चिट्ठी लिहून पोबारा केला. मुलगा गायब झाल्यानं पालकांना अखेर पोलिसांची मदत घ्यावी लागली. पालकांच्या तक्रारीनंतर क्राईम ब्रँचने या मुलाचा शोध घेत त्याला कुटुंबीयांकडे सुपुर्त केलंय.

नेमकं काय घडलं?

पालकांना मुलाने घरात लिहून ठेवलेली चिट्ठी मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार केली. स्थानिक पोलिसांनी याबाबत क्राईम ब्रँचला आणि बेपत्ता मुलांचा शोध घेणाऱ्या मुस्कान युनिटला माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने पालकांनी सांगितलेल्या वर्णनानुसार मुलाचा शोध सुरू केला. पोलीस या मुलाच्या मित्रांशीही बोलले. नंतर पालकांनी पोलिसांनी नवी माहिती दिली. यानुसार मुलाने पबजी गेममधील व्हर्च्युअल कॅशसाठी घरच्यांच्या बँक खात्यातून 10 लाख रुपये खर्च केले.

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेड तपासले. यात त्यांना बेपत्ता मुलगा अंधेरी पूर्वच्या महाकाली गुफा रोडवर दिसला. हे ठिकाण मुलाच्या घरापासून काही अंतरावर होतं. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं. तिथं त्याचं आणि पालकांचं समुपदेशन करण्यात आलं. यानंतर मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं.

हेही वाचा :

Pubg ला पुन्हा बॅनची भीती, चिनी सर्व्हरला डेटा पाठवणं थांबवलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Battlegrounds Mobile India कधी लाँच होणार? बीटा फेजमध्ये कसा आहे नवीन गेम?

खुशखबर! अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध

व्हिडीओ पाहा :

Minor Boy expense 10 lakh rupees from parents bank account for PUBG ID and flees home

Non Stop LIVE Update
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.