AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खुशखबर! अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध

Pubg हा गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) या नावाने भारतात दाखल झाला असून ठराविक अँड्रॉयड युजर्ससाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाला आहे.

खुशखबर! अँड्रॉयड युजर्स Battlegrounds Mobile India खेळू शकणार, डाऊनलोडिंगसाठी गेम उपलब्ध
Pubg Battlegrounds Mobile India
| Updated on: Jun 17, 2021 | 7:01 PM
Share

मुंबई : भारत-चीन तणावाच्या (India-China tension) पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी चीनला मोठा झटका दिला. केंद्र सरकारने भारतात PUBG या लोकप्रिय गेमिंग अ‍ॅपसह 118 चिनी अ‍ॅप बॅन केले होते. दरम्यान, पबजी गेम भारतात परतला आहे. हा गेम नव्या नावासह भारतात दाखल झाला आहे. हा गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (Battlegrounds Mobile India) या नावाने भारतात दाखल झाला असून ठराविक अँड्रॉयड युजर्ससाठी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाला आहे. (Battlegrounds Mobile India is available for download for pre-registered beta testers)

Battlegrounds Mobile India काही युजर्ससाठी उपलब्ध झाला असला तरी फार आनंदित होऊ नका कारण ही फक्त एक प्रारंभिक आवृत्ती (स्टार्टिंग व्हर्जन) आहे आणि बीटा आवृत्तीसाठी साइन अप केलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. ट्विटरवरील काही युजर्सने स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामध्ये हा गेम डाउनलोडिंगसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहे. स्क्रीनशॉटवरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया या गेमची साईज 720MB इतकी आहे.

दरम्यान, आम्हीदेखील गुगल प्ले स्टोरवर जाऊन तपासलं की, खरंच हा गेम प्ले स्टोरवर उपलब्ध आहे का? तर हा गेम अद्याप सर्वांसाठी उपलब्ध झालेला नाही. परंतु कंपनीने काही निवडक युजर्ससाठी (बीटा टेस्टर) हा गेम उपलब्ध करुन दिल्याची माहिती मिळाली आहे. हा गेमचं ओपन बीटा व्हर्जन केवळ त्याच Android युजर्ससाठी Google Play वर उपलब्ध आहे, ज्यांनी या गेममध्ये इंटरेस्ट दाखवला होता, किंवा ज्यांना बीटा टेस्टर म्हणून कंपनीने निवडलं आहे. तथापि, हे स्पष्ट झालेलं नाही की क्राफ्टनने बीटा टेस्टर म्हणून ठराविक युजर्सची निवड कशी केली?

जर तुम्हीदेखील हे स्क्रीनशॉट किंवा तत्सम बातम्या पाहून प्ले स्टोरवर गेम डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत असाल तर थांबा, कारण हा गेम अद्याप सर्वांसाठी उपलब्ध झालेला नाही. परंतु यात महत्त्वाची बाब म्हणजे कंपनीने आता या गेमचं टेस्टिंग सुरु केलं आहे, त्यामुळे हा गेम लाँच होण्यास पूर्णपणे तयार असून लाँचिंगसाठी खूपच कमी वेळ बाकी आहे. कंपनी लवकरच हा गेम सर्वांसाठी रोलआऊट करणार आहे.

Battlegrounds Mobile India खेळण्यासाठी कसा हवा स्मार्टफोन? कोणते फीचर्स गरजेचे?

बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडियाच्या अधिकृत Google Play Store डिटेलनुसार Battlegrounds Mobile India गेम खेळण्यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉयड 5.1.1 च्या पुढचं व्हर्जन असायला हवं. 5.1.1 च्या पुढच्या OS व्हर्जन्सवरच हा गेम चालेल. तसेच फोनमध्ये 2 जीबी किंवा त्यापेक्षा जास्त रॅम असायला हवा.

पालकांच्या परवानगीशिवाय गेम खेळता येणार नाही

क्राफ्टनने आपल्या प्रायव्हसी पॉलिसी डॉक्यूमेंटमध्ये सांगितलं आहे की, जे गेमर्स 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यांना आपल्या पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यावा लागेल. म्हणजेच पालकांचा कॉन्टॅक्ट नंबर न देता ही मुलं पबजी गेम खेळू शकणार नाहीत. ते या गेममध्ये साईन अपच करु शकणार नाहीत. पालकांच्या परवानगीनंतरच ही मुलं पबजी गेम साईन अप करु शकतील.

परंतु येथे कंपनीची सर्वात मोठी चिंता ही आहे की, गेमर्स जो फोन नंबर देतील तो फोन नंबर बरोबर असेल का? कारण कोणताही युजर कोणाचाही फोन नंबर देऊन कंपनीची फसवणूक करु शकतात. अशा परिस्थितीत, कंपनी त्याबद्दल काय विचार करतेय, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

नवा गेम खास भारतीयांसाठी

त्याचबरोबर, या गेमची स्वतःची एसपोर्ट इकोसिस्टम असेल जी टुर्नामेंट आणि लीगसह सुसज्ज असेल. हा गेम मोबाईल डिव्हाइसवर फ्रूी टू प्ले उपलब्ध असेल. दरम्यान, असे म्हटले जात आहे की, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सध्या केवळ भारतीय बाजारातच लाँच केला जाईल. म्हणजेच हा गेम खास भारतीयांसाठीच असणार आहे. हा गेम लॉन्च होण्यापूर्वी प्री रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध असेल. निर्मात्यांनी यामध्ये ट्राय कलर (तिरंगी) थीम दिली आहे, जेणेकरुन भारतीय युजर्स याकडे आकर्षित होतील.

युजर्सचा डेटा सुरक्षित

गेम लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने स्पष्ट केले आहे की, गेमरचा डेटा कुठेही पाठवला जाणार नाही आणि तो पूर्णपणे सुरक्षित असेल. त्याचबरोबर कंपनी सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल. यात डेटा गोपनीयता आणि युजर्सच्या सुरक्षेचा समावेश असेल. कारण गेल्या सप्टेंबरमध्ये याच कारणास्तव या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली होती.

कसा बनला पबजी गेम?

एक जपानी चित्रपट ‘बॅटल रोयाल’ पासून प्रेरणा घेऊन Pubg हा गेम बनवण्यात आला आहे. या चित्रपटात सरकार विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपला बळजबरी करून मृत्यूशी लढायला पाठवतं. त्याच गोष्टीला धरून हा गेम बनवण्यात आला आहे.

हा गेम दक्षिण कोरियाची व्हीडिओ गेम कंपनी ब्लूहोलनं विकसित केला आहे. या कंपनीनं या गेमचं डेस्कटॉप व्हर्जन तयार केलं होतं. परंतु, चीनची कंपनी Tenncent ने काही बदल करून या गेमचं मोबाईल व्हर्जन लाँच केलं. डेस्कटॉप व्हर्जनपेक्षा मोबाईल व्हर्जनला जगभरात खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात हा गेम सर्वात यशस्वी ठरला. जगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 टक्के लोक भारतातील आहेत, 17 टक्के चीनमध्ये तर 6% गेमर्स अमेरिकेत आहेत. जगभरात हा गेम 60 कोटींपेक्षा अधिक लोकांनी डाऊनलोड केला आहे.

संबंधित बातम्या

लाँचिंगआधीच PUBG वर बंदीची मागणी, ‘या’ आमदाराचं थेट पंतप्रधानांना पत्र

भारतात बॅन तरीही PUBG चा जगभरात डंका, 100 कोटींहून अधिक युजर्सकडून गेम डाऊनलोड

100 कोटींहून जास्त युजर्सनी डाऊनलोड केलेला PubG अद्याप ‘या’ दोन गेम्सच्या मागे

बोंबला! PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी

(Battlegrounds Mobile India is available for download for pre-registered beta testers)

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.