शिक्षकाकडून अश्लील मेसेज, दारु पार्टीचंही निमंत्रण, विद्यार्थिनींनी शिकवला जन्माचा धडा

शिक्षक निखिल जोस याला विद्यार्थिनींच्या इन्स्टाग्राम आयडीवर अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल आयटी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांना आरोपी शिक्षकाच्या मोबाईलवरुन स्क्रीनशॉटही मिळाले आहेत.

शिक्षकाकडून अश्लील मेसेज, दारु पार्टीचंही निमंत्रण, विद्यार्थिनींनी शिकवला जन्माचा धडा
प्रातिनिधिक फोटो

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका प्रसिद्ध शाळेतील शिक्षकाने शाळेच्या पासआऊट विद्यार्थिनींना अश्लील मेसेज पाठवल्याचा प्रकार समोर आला आहे. एनसीसी शिक्षक निखिल जोस याने इन्स्टाग्रामवरुन दारु पार्टीचे आमंत्रण देत त्यांना शाळेबाहेर भेटायला बोलावल्याचा आरोप आहे. आरोपी शिक्षकाने 10 पेक्षा जास्त मुलींना अश्लील मेसेज पाठवल्याचा दावा केला जात आहे. अखेर विद्यार्थिनींनी आरोपी शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी एकत्र येऊन सोशल मीडियावर त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली.

आरोपी शिक्षकाला अटक

आरोपी शिक्षकाचे अश्लील संदेशही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशोक नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, संबंधित शाळेचे शिक्षक निखिल जोस याला विद्यार्थिनींच्या इन्स्टाग्राम आयडीवर अश्लील मेसेज पाठवल्याबद्दल आयटी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांना आरोपी शिक्षकाच्या मोबाईलवरुन स्क्रीनशॉटही मिळाले आहेत.

काय आहे प्रकरण?

प्राथमिक तपासात समोर आले आहे की आरोपी निखिल जोस हा NCC शिक्षक आहे. शाळेत ऑनलाईन वर्गांसाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आले होते. मात्र आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनींच्या क्रमांकावर खाजगी गप्पा मारायला सुरुवाती केली. सुरुवातीला विद्यार्थिनींनी त्याला प्रतिसाद दिला नाही. मग शिक्षकाने त्यांना मद्यपान करण्यासाठी हॉटेलमध्ये भेटण्याची ऑफर दिली.

धडा शिकवण्यासाठी ऑनलाईन मोहीम

शाळेच्या अनेक विद्यार्थिनींनाही त्याने रात्री 10 वाजताच्या सुमारास अश्लील संदेश पाठवले. त्यांना होमवर्कच्या बहाण्याने शाळेबाहेर भेटायला बोलावले. शाळेतून पासआऊट झालेल्या विद्यार्थिनींना जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी शिक्षकाला धडा शिकवण्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू केली. शाळेच्या विद्यार्थिनीने इन्स्टाग्रामवर 27 मिनिटे 31 सेकंदांचा व्हिडिओही अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की शिक्षक निखिल जोसने अनेक मुलींशी अश्लील कृत्ये केली आहेत.

मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल

दुसरीकडे, अल्पवयीन शाळकरी मुलींना गेल्या 3 वर्षांपासून बनावट फोटो पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या एका सराईत सायबर स्टॉकरला उत्तर दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पकडलेले सायबर स्टॉकर महावीर आयआयटी महाविद्यालयातून बीटेक करत आहे, परंतु गेल्या तीन वर्षांपासून तो अनेक अल्पवयीन शाळकरी मुली आणि काही शाळेतील शिक्षकांना त्यांच्या मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल करत होता आणि त्याच्या माहितीचा गैरवापर करत होता.

संबंधित बातम्या :

माझी नाहीस तर कोणाची नाहीस, इन्स्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचं एक पाऊल मागे, तरुणाचं हादरवणारं कृत्य

चेहरा भोळा, 50 अल्पवयीन मुलींवर ऑनलाईन ‘डोळा’, पोलिसांनी धरला भामट्याचा गळा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI