माझी नाहीस तर कोणाची नाहीस, इन्स्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचं एक पाऊल मागे, तरुणाचं हादरवणारं कृत्य

लखनौच्या जानकीपुरम पोलीस स्टेशन परिसरात राहणारी संबंधित विद्यार्थिनी पदवी शिक्षण घेत आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून तिची शुभमशी मैत्री झाली आणि दोघांमध्ये गप्पा होऊ लागल्या. शुभमचा हेतू चांगला नाही हे जाणून मुलीने अंतर राखण्यास सुरुवात केली

माझी नाहीस तर कोणाची नाहीस, इन्स्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचं एक पाऊल मागे, तरुणाचं हादरवणारं कृत्य
प्रातिनिधिक फोटो

लखनौ : फेसबुक-इंस्टाग्रामवर मैत्री झाल्यानंतर, जेव्हा मुलीने नातेसंबंध वाढवण्यास नकार दिला, तेव्हा लखनौमध्ये तरुणाने मुलीला तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार करुन जखमी केले. मुलीला तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत.

तरुणाचा वाईट हेतू युवतीने ओळखला

मिळालेल्या माहितीनुसार, लखनौच्या जानकीपुरम पोलीस स्टेशन परिसरात राहणारी संबंधित विद्यार्थिनी पदवी शिक्षण घेत आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून तिची शुभमशी मैत्री झाली आणि दोघांमध्ये गप्पा होऊ लागल्या. शुभमचा हेतू चांगला नाही हे जाणून मुलीने अंतर राखण्यास सुरुवात केली. मात्र ती इतर मित्रांशीही बोलत असल्याने शुभमचा तीळपापड व्हायचा.

नेमकं काय घडलं?

घटनेच्या दिवशी ती मुलगी काही कामानिमित्त तिच्या घराबाहेर आली होती की अचानक आरोपी तरुण पोहोचला आणि तिच्या चेहऱ्यावर धारदार ब्लेडने वार केले. जर तू माझी होऊ शकत नसशील, तर मी तुला कोणाचीही होऊ देणार नाही, असं म्हणत तो पळून गेला.

तरुणीवर उपचार

जखमी मुलीला ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. डीसीपी नॉर्थ झोन देवेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाचे नाव शुभम आहे आणि तो मुलीच्या घराजवळच राहतो, काही काळापूर्वी दोघेही बोलत असत पण मुलीने नकार दिल्यानंतरही तो सतत मुलीशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होता. .

डीसीपी नॉर्थ झोन देवेश पांडे यांनी सांगितले की, तरुणीवर ब्लेडने हल्ला करण्यात आला आहे, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून युवकावर कारवाई केली जात आहे, त्याचा शोध घेतला जात आहे, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकला पोस्ट

दुसरीकडे, माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नसल्याने पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकला पोस्ट केले. हा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात घडला आहे. पत्नीच्या माहेरच्या मंडळींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

काही महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर पती कोणतेही काम करत नव्हता. यामुळे दोघांमध्ये अनेकदा कामावर न जाण्याच्या कारणामुळे वाद होत असे. नाराज झालेल्या पत्नी वादानंतर रागात घर सोडून माहेरी निघून गेली. माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नसल्याने रागात पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले.

या घटनेमुळे पत्नीच्या माहेरच्यांनी संताप व्यक्त करत थेट आरोपी पतीच्या विरोधात तक्रार केली. तसेच या आधीही आरोपी पतीने बसस्टॉपवर पत्नी तिच्या वडिलांसह दिसताच तिच्यावर ब्लेडने वार करुन जखमी केले होते.

संबंधित बातम्या :

प्लीज आई-बाबांना समजव, भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या

ब्लाऊजने गळा आवळून सासूची हत्या, पोत्यात भरुन मृतदेह झुडपात फेकला, पिंपरीत मुलगा-सूनेला अटक

सासूच्या हत्येची फिर्याद देणारी सूनच निघाली खूनी, जमिनीसाठी दोरीने गळा आवळून हत्या

ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेरहून एक लाख आणण्याचा तगादा, गर्भवती सुनेचा गळा आवळून खून

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI