Deepali Chavan Audio Clip : ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

RFO दीपाली चव्हाण आणि डीसीएफ विनोद कुमार यांच्यामध्ये फोन वरून जे वार्तालाप झालं त्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे.

Deepali Chavan Audio Clip :  ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण
RFO दीपाली चव्हाण आणि कथित अधिकाऱ्यामध्ये झालेला संवाद
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 9:59 PM

अमरावती : मेळघाटातील RFO दीपाली चव्हाण आणि डीसीएफ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जे वार्तालाप झालं त्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये संबंधित अधिकारी आपल्याच वनविभागाच्या महिला अधिकाऱ्यांसोबत कशाप्रकारे एकेरी भाषेत बोलतात. बोलताना मान मर्यादा आणि महिलांशी कसं बोलायचं याचं सुद्धा भान त्यांना उरलेलं दिसत नाही. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमका काय संवाद आहे, आपण पाहूया. (Audio clip of conversation between RFO Deepali Chavan and DFO Vinod Kumar goes viral)

कथित ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय संभाषण?

दिपाली : हॅलो, जय हिंद सर

समोरची व्यक्ती : हा जय हिंद ! कुठे आहात तुम्ही?

दिपाली : सर हरिसालमध्ये आहोत. आम्ही निघणार होतो. पण ठाकरे सर येत आहेत. त्यामुळे त्यांची वाट बघतोय.

समोरची व्यक्ती : हरिसालमध्ये कोण कोण आहे?

दिपाली : ठाकरे सर पाटीयाच्या दिशेला निघाले होते. सध्या ते मालूर येथून निघाले. तर मोरे आणि चौधरी सर डायरेक्ट धारणी पोहोचणार आहेत.

समोरची व्यक्ती : कोणत्या कामासाठी?

दिपाली : सर तिथले DYSP त्या दोघांच्या ओळखीचे आहेत.

समोरची व्यक्ती : त्या दोघांना पाठवा इकडे. त्यांना कोणी सांगितलं तिथे जायला? एकाने सांगितलं मला, तू बिलकूल वाचणार नाही. समजलं का तुला?

दिपाली : हा..हा..

समोरची व्यक्ती : तू जास्त.. मला माहिती नाही तिथे तुझं काय सुरु आहे.

दिपाली : ते इथे नाहीत सर

समोरची व्यक्ती : कोण इथे नाहीत?

दिपाली : चौधरी आणि मोरे सर. ते त्यांच्या त्यांच्या हेडक्वॉटरला आहेत.

समोरची व्यक्ती : ते त्यांच्या हेडक्वॉटरला असतीलही. मी तुझ्या हरिसालबद्दल बोलतोय. तिथे त्यांचं काम नाही. तुझा स्टाफ कुठे आहे हल्ली?

दिपाली : माझा स्टाफ हरिसालमध्ये आहे.

समोरची व्यक्ती : तुझ्या स्टाफशी मला काही घेणंदेणं नाही. तुझ्यावर अॅट्रोसिटी लावणार आहेत. पंधरा-वीस मनिटात तयार राहा. मी स्वत: त्यांना तुझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करण्यास सांगणार आहे. ठिक आहे? तुला MLA साहेबांकडून फोन आला होता का?

दिपाली : नाही

समोरची व्यक्ती : नही आला. का? फोन बंद होता का?

दिपाली : सर तिथे फोनला रेंज कुठू असतो?

समोरची व्यक्ती : का तिथे फोनला रेंज नसते? आता असे उत्तरं देणार आहेस का तू? मी आता तुझ्याविरोधात अॅट्रोसिटीसाठी सूचना दितो.

दिपाली : सर मी जामून सरांच्या फोनवरुन तुम्हाला कॉल केलाय.

समोरची व्यक्ती : अरे आधी व्यवस्थित बोल. समजत नाही का? आम्ही तुला एवढं वाचवलं आणि तू माझा फोन उचलत नाहीस. रिंग जाते आणि उचवलत नाही.

दिपाली : सर माझा फोन तर माझ्याजवळ नव्हता. मला तर फोनही आला नाही.

समोरची व्यक्ती : हा तुझा फोन तुझ्याकडेच असतो. रिंग जाते पण उचलत नाही.

दिपाली : सर मांगियामध्ये फक्त दोन लोकांच्या फोनमध्ये रेंज होती.

समोरची व्यक्ती : आता ऐक ! आता तिथून निघा तुम्ही. लोकांना माफीनामा लिहायला सांगा. जे लोकं माफी मागितली त्यांच्यावर काहीच कारवाई करणार नाही, असं सांगा. जो माफीनामा देणार नाही त्याच्यावर कारवाई करु.

दिपाली : सर तुम्ही बोलले तेव्हाच आम्ही देखील निघालो होतो. तुम्ही बोलले त्याचवेळी स्ट्रक्चर हटवलं होतं.

DFO शिवकुमार : त्याचवेळी स्ट्रक्चर हटवलं मग गाडी का थांबवली त्या लोकांनी?

दिपाली : आरोपीला हरिसाल पाठवलं होतं. त्याला जोपर्यंत पाठवत नाही. तोपर्यंत जाऊ देणार नाही, असं ते म्हणत होते.

समोरची व्यक्ती :: मग हरिसाल कोणी पाठवलं होतं? मी पाठवलं की तू पाठवलं होतं

दिपाली : मी पाठवलं होतं.

समोरची व्यक्ती : का पाठवलं होतं?

दिपाली : कारण तुम्ही आरोपीला अटक करायला सांगितलं होतं.

समोरची व्यक्ती : आता मी एसपी साहेबांना अॅट्रोसिटीसाठी सांगणार आहे. ते आता एकदा बघावंच लागेल.

दिपाली : मला MLA मॅडमचा फोन आला नाही

समोरची व्यक्ती :  कोण? नवनीत राणा कोण? नवनीत राणा MLA मॅडम आहेत का?

दिपाली : सॉरी राजकुमार पटेल. त्यांचाही फोन आला नव्हता.

समोरची व्यक्ती :  तुला मी वायरलेसवर बात करायला सांगितलं तर तू फोन केला. वायरलेसवर तुझं लोकेशन मला कळेल.

दिपाली : सर आता वायरलेसवर बात करते.

समोरची व्यक्ती : आता तुमच्यासोबत कोण आहे?

दिपाली : वनपाल दिग्वे.

समोरची व्यक्ती : आता कुठे आहात?

दिपाली : हरिसालमध्ये आहे.

समोरची व्यक्ती : हा हरिसाल तर खूप मोठं गाव आहे. नेमकं कुठे आहात?

दिपाली : सर माझ्याच क्वाटरच्या समोर आहे.

समोरची व्यक्ती : म्हणूनच वायरलेसवर बात करण्यासाठी बोलत होतो.

दिपाली : सर ACF सरचा फोन आला होता. सरांनी तुम्ही फोन केला होता. त्यांनी सांगितलं की मोबाईलवर फोन करायला सांगितलं.

DFO शिवकुमार : पण मी त्यांना तसं सांगितलं नाही. फाल्तू बाता करु नको. तुला मी वायरलेसवर संपर्क करायला तर त्यावर संपर्क करायचा.

दिपाली : हा सर

संबंधित बातम्या :

साताऱ्याची दीपाली, मेळघाटात वनअधिकारी, स्वत:वर गोळी झाडली, हादरवणारी सुसाईड नोट जशीच्या तशी

‘त्या’ अधिकाऱ्याकडून दीपालीच्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न; ही आत्महत्या नवे तर हत्या: चित्रा वाघ

Audio clip of conversation between RFO Deepali Chavan and DFO Vinod Kumar goes viral

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.