AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Blast : दिवसा डॉक्टर, संध्याकाळी वेगळंच रूप, दुपारी 4 नंतर कोणतं काम करायची डॉ. शाहीना ? धक्कादायक माहिती उघड

डॉ. शाहिना सईद हिने संध्याकाळी 4 नंतर लाल किल्ल्यावरील स्फोटाची तयारी सुरू केली होती का? 32 गाड्यांचे एक भयानक नेटवर्क, i20, ब्रेझा आणि इकोस्पोर्टमध्ये लपलेली स्फोटकं - ही केवळ एक सुरुवात होती का?

Delhi Blast : दिवसा डॉक्टर, संध्याकाळी वेगळंच रूप, दुपारी 4 नंतर कोणतं काम करायची डॉ. शाहीना ? धक्कादायक माहिती उघड
डॉ. शाहीनाचे मनसुबे काय ?Image Credit source: social media
| Updated on: Nov 14, 2025 | 9:55 AM
Share

सोमवारी संध्याकाळी सातच्या सुमारास दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाने (Delhi Blast) अख्खा देशच हादरला. कारमध्ये झालेल्या या आत्मघातकी स्फोटा आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त लोकं गंभीर जखमी आहेत. तपास यंत्रणांनी पिंजून तपास करत या स्फोटाचे धागेदोरे शोधायला सुरूवात केली आहे. या प्रकरणाच्या तपासात असे दिसून आले की हा हल्ला म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीचे काम नव्हे, तर पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदच्या “व्हाइट-कॉलर दहशतवादी मॉड्यूल” शी याचा थेट संबंध आहे. या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेली प्रमुख व्यक्ती म्हणजे फरीदाबाद येथील अल-फलाह स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटरची डॉ. शाहिना सईद होती. दिवसभर नोकरी करून दुपारी 4 नंतर शाहिान ही तिचं ‘खरं काम’ सुरू करायची अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

तिचं वागणं विचित्र होतं आणि बऱ्याचवेळा ती इतर कोणालाही न कळवता थेट निघून जायची, असं सहकाऱ्यांन सांगितलं. तपासात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, डॉ. शाहिना सईदकडे जपमाळ (मिस्बाहा) आणि हदीसचे पुस्तक होते. ही धार्मिक प्रथा होती की दहशतवादाशी जोडेले संकेत? तपास पथकाकडून या पैलूचाही तपास करण्यात येत आहे.

जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखेची प्रमुख होती शाहिदा ?

गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या नुसार, डॉ. शाहिना सईद ही जैश-ए-मोहम्मद च्या महिला शाखेची प्रमुख होती, ही संघटना (जैश) 2011 साली संसदेवर झालेला हल्ला आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्याशी संबंधित होती. सोमवारी सकाळी लखनऊमधील लाल बाग येथे डॉ. शाहीनाला अटक करण्यात आली. त्यानंतर अवघ्या काही तासांनीच तिचा सहकारी डॉ. उमरने दिल्लीत लाल किल्ल्याजवळ i20 कारमध्ये बसून आत्मघातकी स्फोट घडवला, त्यात त्याच्यासह 12 जणांचा मृत्यू झाला.

डॉ. शाहिना सईद ही पूर्वी कानपूर मेडिकल कॉलेजमध्ये औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या प्रमुख होती, नंतर तिची कन्नौज मेडिकल कॉलेजमध्ये बदली झाली. तिच्या अटकेपूर्वी डॉ. मुझम्मिल शकील आणि डॉ. आदिल अहमद राथेर या दोन संशयितांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात, ह्युंदाई आय 20 कार, मारुती ब्रेझा, स्विफ्ट डिझायर आणि फोर्ड इकोस्पोर्टसह किमान 32 कार वापरण्याची योजना आखण्यात येत होई अशी धक्कादायक माहिती देखील उघड झाली आहे.

एका स्फोटासाठी 32 कार्सची योजना ?

तसेच तपासात असेही दिसून आले की या 32 गाड्या फक्त एका ठिकाणी स्फोट घडवण्यासाठी नव्हत्या. त्यापैकी अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी स्फोटके वाहून नेण्यासाठी, लक्ष्यांची रेकी करण्यासाठी आणि पळून जाण्याचे नियोजन करण्यासाठी वापरल्या जात होत्या. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ i20 कारचा स्फोट झाला, तर ब्रेझा ही कार स्वतः सईद चालवत होती आणि डिझायर ही कार मुख्य संशयित डॉ. मुझम्मिल शकील वापरत होता. फोर्ड इकोस्पोर्टमध्येही त्यातही थोड्या प्रमाणात स्फोटक पदार्थ होते.

आत्तापर्यंत किती कार सापडल्या ?

संशयितांनी किमान चार मोठ्या गाड्या वापरल्या होत्या असे तपासात दिसून आले.

हुंदाई i20: ज्यात स्फोट झाला

मारुति स्विफ्ट डिज़ायर : शकीलचे वाहन, त्यामध्ये असॉल्ट रायफल आणि स्फोटकं सापडली, ती जप्त करण्यात आली.

मारुती ब्रेझा: डॉ. शाहिना सईद स्वतः ही कार चालवत होती आणि ते पळून जाण्यासाठी ती गाडी वापरली जाणार होती.

इकोस्पोर्ट: मीटिंगसाठी आणि स्फोटके वाहून नेण्यासाठी ही कार वापरली गेली.

या मॉड्यूलने राष्ट्रीय राजधानी आणि देशाच्या इतर भागात बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्याची योजना आखली होती असं तपासकर्त्यांचा मानणं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या योजनेत किमान 32 गाड्यांचा समावेश होता, मात्र त्या सर्व बॉम्ब पोहोचवण्यासाठी होत्या की फक्त पाळत ठेवण्यासाठी आणि तयारीसाठी वापरल्या जात होत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तसेच तपासात असेही दिसून आले की हे मॉड्यूल फरिदाबाद येथून चालवले जात होते आणि त्यात अनेक डॉक्टरांचा समावेश होता. या मॉड्यूलचा खरा उद्देश अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवणे आणि पळून जाण्याची योजना आखणे हा होता असा सुरक्षा एजन्सींना संशय आहे . जर हे मॉड्यूल वेळीच पकडले गेले नसते तर राजधानी आणि आसपासच्या भागात मोठी विनाश घडू शकला असता असंही त्यांचं म्हणणं आहे.

तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.