“नवरा घरी आलाय, त्याला पकडा, पण गोळी घालू नका, आज करवा चौथ आहे” फरार आरोपीच्या पत्नीचीच पोलिसांना टीप

पलिकडून महिलेने सांगितले की, माझा नवरा आला आहे, त्याला तुम्ही पकडा. मात्र आज करवाचौथ असल्याने मी नवऱ्यासाठी उपवास ठेवला आहे, त्यामुळे कृपया त्याला गोळी मारु नका, असं आर्जव महिलेने केलं.

नवरा घरी आलाय, त्याला पकडा, पण गोळी घालू नका, आज करवा चौथ आहे फरार आरोपीच्या पत्नीचीच पोलिसांना टीप
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 3:18 PM

नवी दिल्ली : उत्तर भारतीय समाजात करवा चौथच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपवास ठेवते. चंद्रोदयानंतर पतीचे दर्शन घेऊन पत्नी उपवास सोडते. मात्र दिल्लीतील विवाहितेने चक्क करवा चौथच्या मुहूर्तावरच आपल्या फरार पतीला पोलिसांच्या स्वाधीन केले. महिलेने पोलिसांना फोन करुन तो घरी आल्याची टीप दिली.

काय आहे प्रकरण?

19 ऑक्टोबर रोजी सकाळी दिल्लीतील नजफगड भागातील राम बाजार येथील एका दुकानात आरोपीने मायलेकीवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला, तर तिची मुलगी जखमी आहे. गोळीबारानंतर आरोपी पसार झाला होता. पत्नीने फोनवरुन दिल्ली पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

द्वारकाचे डीसीपी शंकर चौधरी यांना रविवारी एक फोन आला. पलिकडून महिलेने सांगितले की, माझा नवरा आला आहे, त्याला तुम्ही पकडा. मात्र आज करवाचौथ असल्याने मी नवऱ्यासाठी उपवास ठेवला आहे, त्यामुळे कृपया त्याला गोळी मारु नका, असं आर्जव महिलेने केलं. आरोपी राजीव गुलाटी गोळीबाराची घटना घडल्यानंतर फरार होता. पत्नीने माहिती देताच डीसीपी तात्काळ स्वत: द्वारका येथे पोहोचले आणि त्यांनी आरोपीला पकडले.

नेमकं काय घडलं होतं?

19 ऑक्टोबर रोजी राजीव गुलाटीने नजफगढमध्ये एक वृद्ध महिला आणि तिच्या मुलीवर गोळीबार केला होता. या गोळीबारात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर मुलीवर अद्याप उपचार सुरु आहेत. राजीव गुलाटी आणि पीडित कुटुंबामध्ये मालमत्तेसंदर्भात वाद सुरु होता. गुन्हा घडल्यावर राजीव गुलाटी फरार झाला. त्याच्या शोधात पंजाब, हरियाणा, दिल्लीसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत होते.

डीसीपींची धडक कारवाई

दरम्यान, रविवारी करवा चौथच्या दिवशी राजीव पत्नीला भेटण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचला. राजीव घरी पोहोचताच त्याच्या पत्नीने पोलिसांना फोन केला. पत्नी म्हणाली की, माझा नवरा आला आहे, पण त्याला गोळ्या घालू नका, मी करवा चौथचा उपवास ठेवला आहे. यानंतर डीसीपीच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.

डीसीपी चौधरी यांनी स्वतः राजीव गुलाटी याची कॉलर पकडून त्यांना घराबाहेर खेचत नेले. राजीवकडून हत्येसाठी वापरलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

मॉडेल मोना राय हत्येचे गूढ उकललं, बिल्डरच्या बायकोने सुपारी देऊन संपवलं, धक्कादायक कारण समोर

थुंकताना पाय घसरला, ग्रीलमध्ये गळा अडकून नवऱ्याचा मृत्यू, बायको घराबाहेर येईपर्यंत होत्याचं नव्हतं!

खजिन्याच्या लालसेतून बायकोचा बळी, नऊ महिन्यांनी डॉक्टर पती पोलिसांच्या जाळ्यात

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.