खजिन्याच्या लालसेतून बायकोचा बळी, नऊ महिन्यांनी डॉक्टर पती पोलिसांच्या जाळ्यात

11 फेब्रुवारी रोजी चन्नकशप्पाने शिल्पाला डेक्सामेथासोनचा डोस दिला, त्यानंतर ती आजारी पडली आणि रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

खजिन्याच्या लालसेतून बायकोचा बळी, नऊ महिन्यांनी डॉक्टर पती पोलिसांच्या जाळ्यात
प्रातिनिधीक फोटो

बंगळुरु : दावणगेरे जिल्ह्यातील ‘काळ्या जादू’शी निगडीत एका प्रकरणात कर्नाटक पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. इंजेक्शनमधून औषधाचा तीव्र डोस देऊन पत्नीची हत्या केल्याबद्दल एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण 9 महिने जुने असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी कर्नाटकातील न्यामती तालुक्यातील मारेश्वरा गावात मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्या 45 वर्षीय डॉ. चन्नकेशप्पा याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

डॉ. चन्नकेशप्पाची पत्नी शिल्पाच्या मृत्यूनंतर तिच्या पालकांनी 11 फेब्रुवारी रोजी दावणगेरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीत तिच्या पालकांनी आपल्या मुलीचा मृत्यू हा अपघात नसून नियोजनबद्ध खून असल्याचा दावा केला होता. सुरुवातीच्या तपासादरम्यान, डॉक्टर त्याच्या पत्नीला कमी रक्तदाबाचा त्रास असल्याचा दावा करुन अटक टाळण्यात यशस्वी झाला.

खजिन्याच्या हव्यासातून पत्नीचा खून

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या अधिक तपासादरम्यान, असे आढळून आले की चन्नकेशप्पा गेल्या एक वर्षभरापासून वारंवार ‘काळी जादू’ करणाऱ्या मांत्रिकाला भेटत होता. यादरम्यान त्याला खजिना मिळवायचा असेल तर पत्नीचे ‘बलिदान’ द्यावे लागेल, असा सल्ला देण्यात आला. खजिन्याच्या लालसेपोटी 11 फेब्रुवारी रोजी चन्नकशप्पाने शिल्पाला डेक्सामेथासोनचा डोस दिला, त्यानंतर ती आजारी पडली आणि रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

सीबी रयश्यंतच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, आरोपी डॉक्टर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. आम्ही डॉक्टरविरोधात हत्या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने (एफएसएल) औषध दिल्याची पुष्टी केल्यानंतर डॉक्टरला 18 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. काळ्या जादूची अशीच एक घटना नुकतीच कर्नाटकातील बेळगावी येथेही आढळून आली होती, ज्यात पीडितेच्या शरीरावर जळल्याच्या खुणा आढळल्या होत्या.

संबंधित बातम्या :

आई-बहिणीला दिलेल्या त्रासाचा वचपा, पॅरोलवर सुटलेल्या बापाची मुलाकडून हत्या

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, पुण्यात जन्मदात्रीकडून तीन महिन्यांच्या बाळाचा खून

पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नाहीत, नैराश्यातून पतीची गळफास घेत आत्महत्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI