AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला

दिल्लीच्या सीमेजवळ सुशील कुमारसोबत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. (Wrestler Sushil Kumar Sagar Rana Murder)

Sushil Kumar | फरार पैलवान सुशील कुमारला अखेर अटक, 18 दिवसांचा शोध संपला
ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार
| Updated on: May 23, 2021 | 11:33 AM
Share

नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सागर राणाच्या झालेल्या हत्ये प्रकरणी (Sagar Rana Murder) मुख्य आरोपी, ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारला (Sushil Kumar) अखेर अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी राजधानीच्या सीमावर्ती भागातून सुशील कुमारला बेड्या ठोकल्या. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची जिल्हा कोर्टात हजेरी होणार आहे. सागर राणा हत्या प्रकरणात सुशील कुमार जवळपास 18 दिवसांपासून फरार होता. (Delhi Police Special Cell arrested Wrestler Sushil Kumar in Sagar Rana Murder)

मोबाईल ट्रेस करुन सुशीलला बेड्या

दिल्लीच्या सीमेजवळ सुशीलसोबत त्याच्या अन्य दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. सुशीलविरोधात लूक आऊट नोटीस आणि अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर एक लाखांच्या पारितोषिकाची घोषणा केली होती. अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर दिल्लीच्या मॉडेल टाऊन एसीपींच्या नेतृत्वात दोन पोलीस निरीक्षक आणि डझनभर पोलीस कर्मचारी त्याच्या शोधात पंजाबला गेले होते. अखेर मोबाईल ट्रेस करुन सुशील आणि त्याच्या साथीदारांनी दिल्लीच्या सीमेवरुन ताब्यात घेण्यात आलं.

सुशील कुमारने आपल्या साथीदारांसोबत 4 मे रोजी रात्री पैलवान सागर राणा उर्फ सागर धनखडसह तिघा जणांचं अपहरण केल्याचा आरोप आहे. दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये सुशील आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली, त्यामध्ये 23 वर्षीय सागरचा मृत्यू झाला. सागरचे पिता अशोक धनखड दिल्ली पोलिसात कॉन्स्टेबल आहेत. सागर छत्रसाल स्टेडियममध्येच राहत होता. तो सुशीलकुमारचा शिष्य होता. प्रशिक्षण काळात सागरने अनेक पदकंही जिंकली.

(Wrestler Sushil Kumar Sagar Rana Murder)

सीसीटीव्हीत सुशील कुमार मारहाण करताना कैद

छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये सुशील कुमार सागरला मारहाण करताना दिसत असल्याचा आरोप सागरच्या कुटुंबीयांनी केला होता. त्या दिवशी सागरचे तीन साथीदार सोनू, भगतसिंग आणि अमित यांनाही स्टेडियममध्ये मारहाण करण्यात आली होती. या सर्वांनी आपल्या जबानींमध्ये मुख्य आरोपी म्हणून सुशील कुमार याचेच नाव घेतले आहे.

सागरच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा

सुशील कुमार इतर पैलवानांच्या साथीने पूर्ण तयारीनिशी कुस्तीपटू सागर राणाला मारहाण करायला आला होता. पोस्टमार्टम अहवालानुसार सागरच्या छातीखेरीज इतर शरीरावर काठ्या आणि लोखंडी रॉडने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आहेत.

कोण आहे सुशील कुमार?

सुशील कुमार हा भारताकडून दोन वेळा वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारा एकमेव अॅथलीट आहे. 37 वर्षीय सुशील कुमारने 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्समध्ये रौप्य, तर 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. 2008 मध्ये सुशील कुमारने जिंकलेलं पदक हे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक्समध्ये कुस्ती प्रकारात भारताने पटकवलेलं दुसरं पदक होतं. त्याला 2009 मध्ये राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा सन्मानाने गौरवण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या :

हाणामारीत पैलवानाचा मृत्यू, ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा पोलिसांना शोध

Sushil Kumar | पैलवान सुशील कुमारच्या शोधात पोलिसांची लूकआऊट नोटीस, सागर राणा मृत्यू प्रकरणात नाव

(Delhi Police Special Cell arrested Wrestler Sushil Kumar in Sagar Rana Murder)

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.