AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Car Blast : दिल्ली स्फोटाशी कनेक्शन, अल-फलाह यूनिवर्सिटीवर मोठी Action

Delhi Car Blast : मागच्या आठवड्यात दिल्लीत शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला. हा दहशतवादी हल्ला आहे. या स्फोटाचं कनेक्शन फरीदाबादच्या अल-फलाह यूनिवर्सिटीशी आहे. कारण इथल्या काही डॉक्टरांची नाव तपासात समोर आली आहेत. आता या अल-फलाह यूनिवर्सिटी भोवती तपास यंत्रणांनी फास आवळायला सुरुवात केली आहे.

Delhi Car Blast : दिल्ली स्फोटाशी कनेक्शन, अल-फलाह यूनिवर्सिटीवर मोठी Action
al falah university
| Updated on: Nov 18, 2025 | 9:32 AM
Share

दिल्ली ब्लास्टनंतर चर्चेत आलेल्या फरीदाबादच्या अल-फलाह यूनिवर्सिटीच्या ठिकाणांवर प्रवर्तन निदेशालयाने (ED) छापेमारीची कारवाई केली आहे. तपास यंत्रणांनी मंगळवारी दिल्लीच्या ओखला-जामिया नगरसह 25 ठिकाणी छापे मारले. ईडीच सकाळी 5 वाजल्यापासून अल-फलाह यूनिवर्सिटी, त्यांचे ट्रस्टीज़ आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती/संस्थांच्या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरु आहे. संस्थेवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप आहे. ईडी फंडिंगचा तपास करत आहे. व्हाइट टेरर मॉड्यूलमुळे अल फलाह यूनिवर्सिटी तपासाच्या केंद्र स्थानी आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी तपास आणि फसवणुकीसाठी विश्वविद्यालय विरूद्धच्या दोन प्रकरणांमध्ये अल फलाह विश्वविद्यालयच्या अध्यक्षांना दोन समन जारी केले होते.

विश्वविद्यालयाचे चेअरमन जावेद अहमद सिद्दीकी यांना समन जारी करणं व्यापक तपासाचा भाग आहे. मागच्या आठवड्यात लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाशी संबंधित हा तपास आहे. स्फोटाशी संबंधित असलेल्यांचा या यूनिवर्सिटीशी संबंध आहे. त्यामुळे तपास यंत्रणांना संस्थेतील रेकॉर्ड, आर्थिक आदान-प्रदान आणि प्रशासकीय मंजुरीची चौकशी करावी लागत आहे.

फास आवळायला सुरुवात

दिल्ली कार स्फोटाचा तपास जसा-जसा पुढे जातोय, तसं-तसं अल-फलाह युनिवर्सिटीच प्रकरणही तापत चाललं आहे. युनिवर्सिटी विस्तारात मोठ्या प्रमाणात नियमांच उल्लंघन झाल्याचं तपास यंत्रणांना संशय आहे. त्यामुळे प्रशासनाने आता युनिवर्सिटी भोवती फास आवळायला सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशासनाचे लोक अलीकडेच युनवर्सिटीमध्ये गेलं होतं. त्यावेळी आढळून आलं की, अनेक निर्माण कार्य विना मंजुरी करण्यात आली आहेत किंवा नियमांकडे डोळेझाक करण्यात आलीय.

पुढची कारवाई काय?

तपास यंत्रणांच लक्ष आता युनिवर्सिटीचं फंडींग, पैशाचे व्यवहार आणि दहशतवादाशी संबंधित लिंकवर आहे. दिल्ली पोलिसांनी युनिवर्सिटी विरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे आधीच दाखल केले आहेत. सध्या सगळ्यांची नजर प्रशासनाच्या पुढच्या कारवाईवर आहे. युनिवर्सिटीतील बेकायद बांधकामावर लवकरच बुलडोझर फिरवला जाऊ शकतो.

आत्मघातकी दहशतवादी हल्ला

मागच्या आठवड्यात सोमवारी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ i20 कारमध्ये शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. यात 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. डॉ. उमर स्फोटाच्यावेळी कारमध्ये होता. हा आत्मघातकी दहशतवादी हल्ला आहे. डॉ. उमर पुलवामाचा रहिवाशी असल्याचं तपासात समोर आलं.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.