डिलिव्हरी बॉयने घाणेरडे कृत्य! लिफ्टमध्येच… लोकांनी सीसीटीव्ही फुटेज पाहाताच पोलीसांना सोपावले
विरार पश्चिमेतील बोलिंज पोलीस ठाण्यात एका डिलिव्हरी बॉयविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याने बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये लघवी केल्याच्या आरोप तक्रारीमध्ये करण्यात आली आहे.

मुंबईतील विरार पश्चिम येथे सोमवारी एक विचित्र घटना घडली. ब्लिंकिटसाठी काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने विरार पश्चिमेतील सीडी गुरुदेव बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये लघवी केली. हे कृत्य बिल्डिंगच्या लिफ्टमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बिल्डिंगच्या रहिवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला आणि नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
लिफ्टमध्ये घाणेरडा वास येत असल्यामुळे सोसायटीतील लोकांनी सीसीटीव्ही फुटेच चेक केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, डिलिव्हरी बॉय लिफ्टमध्ये एकटाच होता. लिफ्ट सुरू झाल्यावर तो आधी इकडे-तिकडे पाहतो आणि मग लिफ्टच्या भिंतीला टेकून लघवी करतो. हे अतिशय घाणेरडे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
वाचा: सुंदर मुलगी द्यायची ऑफर, हॉटेलच्या खोलीत लाळ गाळत पोहोचायचे लोक; मग वकील, पोलिस आणि…
सीसीटीव्ही फूटेजमध्ये घटना कैद
या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर रहिवाशांनी त्याला पकडले. जेव्हा लोकांनी त्याला पकडून फटकारले, तेव्हा सुरुवातीला डिलिव्हरी बॉयने असे कृत्य केल्याचे नाकारले. मात्र, काही लोकांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवले आणि त्याची मारहाण केली. तेव्हा त्याने हे कृत्य केल्याची कबूली दिली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांच्या मते, ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा रहिवाशांनी परिस्थिती पाहिली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फूटेजमध्ये हे कृत्य स्पष्ट दिसत होते. त्यानंतर त्यांनी ब्लिंकिटच्या कार्यालयात त्या व्यक्तीची चौकशी केली, जिथे त्याच्यासोबत कथित मारहाण झाली. हे प्रकरण विरार पश्चिमेतील सीडी गुरुदेव बिल्डिंगशी संबंधित आहे. ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयवर बिल्डिंगच्या लिफ्टमध्ये लघवी केल्याच्या आरोपाखाली विरार पश्चिमच्या बोलिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
