महिलांनी केली हात की सफाई, कुणाचं पाकीट चोरलं, तर कुणाची सोनसाखळी; जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगावमध्ये चोरांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथा ऐकण्यासाठी काल जळगावात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत काही चोरांनी हात की सफाई केली. कथा संपल्यानंतर भाविकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर भाविकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी या चोरांना ताब्यात घेतलं असून दोन डझन चोरांची टोळी पोलिसांनी पकडली आहे.

महिलांनी केली हात की सफाई, कुणाचं पाकीट चोरलं, तर कुणाची सोनसाखळी; जळगावातील धक्कादायक प्रकार
crime
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 12:41 PM

जळगाव | 6 डिसेंबर 2023 : जळगावात अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कथा ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांना चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कथा ऐकण्यात रममाण असणाऱ्या या भाविकांचं कुणाचं पाकीट मारलं तर कुणाची सोनसाखळी लांबवण्यात आली आहे. आपले पैसे आणि दागिने चोरीला गेल्याचं लक्षात आल्यानंतर या भाविकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मोठ्या प्रमाणावर भाविक पोलीस ठाण्यात आल्याने पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून 27 जणांना ताब्यात घेतलं आहे. चोरी करणाऱ्यांची ही टोळीच असल्याचं सांगितलं जात आहे.

जळगावात पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आलं आहे. या कथेच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने, पैशांची पाकीटं आणि मौल्यवान वस्तू चोरी करण्यात आली आहे. भाविक कथा ऐकण्यात मश्गूल असताना या चोरट्यांनी हात की सफाई केली आहे. कथेचा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याकडील ऐवज चोरीला गेल्याचं भाविकांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या भाविकांनी पोलिसांकडे चोरीच्याच तक्रारी केल्या आणि ही चोरी कथेच्या कार्यक्रमात झाल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयावरून काही जणांना ताब्यात घेतलं आहे.

पोलीसांचं आवाहन

या कारवाईत एका पुरुषासह तब्बल 27 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. गर्दीचा फायदा घेत या सर्वांनी महिलांचे दागिने तसेच पुरुषांचे पाकीट चोरले. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कथा स्थळी असलेल्या ठिकाणावरून एकेक करत 27 ते 28 संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. या कथेत येणाऱ्या भाविकांनी कुठल्याही मौल्यवान वस्तू आणि दागिने अंगावर घालून येऊ नये, असं आवाहन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी केलं आहे.

मंत्री चक्क जमिनीवर बसले

जळगावात वडनगरी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आल आहे. सात दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. या कथेच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा उपस्थिती लावली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही प्रदीप मिश्रा यांचे दर्शन घेत जमिनीवर बसून शिवपुराण कथा ऐकली. जमिनीवर बसून कथा ऐकणाऱ्यांमध्ये गुलाबराव पाटील यांना बघून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

मंत्री असतानाही चक्क जमिनीवर बसून मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रदीप मिश्रा यांची कथा ऐकली. यातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातला साधेपणा पाहायला मिळाला. गुलाबराव पाटील यांनी जमिनीवर बसून कथा ऐकणं हा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय बनला.

लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.