Dhule : विहिरीचा भाग कोसळून मायलेकाचा मृत्यू! 36 वर्षीय महिलेसह 10 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार

Dhule : विहिरीचा भाग कोसळून मायलेकाचा मृत्यू! 36 वर्षीय महिलेसह 10 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
दुर्दैवी घटना
Image Credit source: TV9 Marathi

ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय.

विशाल ठाकूर

| Edited By: सिद्धेश सावंत

May 14, 2022 | 1:34 PM

धुळे : बीडमध्ये (Beed News) विहिरीत बुडून वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच आता हृदय हेलावून टाकणारी घटना धुळ्यात घडली आहे. धुळ्यातील (Dhule News) मोरशेवडी येथे विहिरीचा भाग कोसळून दोघे ठार झाले आहे. ठार झालेल्या दोघांमध्ये मुलगा आणि आईचा (Mother son died) समावेश आहे. 36 वर्षीय महिला आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश असा मायलेकाचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालाय. ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतोय. शेतातील विहीर बघण्यासाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते आहेत.

नुकतेच गावात आले होते..

मृत महिला आणि मुलगा हे नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. नुकतेच मोरशेवडी येथे ते नातेवाईकांकडे आले होते. मात्र यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेनं आई आणि मुलाचा जीव घेतलाय. त्यामुळे संपूर्ण गावाला मोठा धक्का बसलाय.

ढिगाऱ्याखाली गाढले गेले…

धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे शेतात विहीर बघण्यासाठी गेलेल्या दोघे मायलेक गेले होते. त्यावेळी विहिरीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अडकले गेले आणि त्यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  सुनीता पवार, वय 36 आणि शाम पवार, वय 10 असे मृत झालेल्या मायलेकांची नावं आहेत. ते नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून नुकतेच मोरशेवडी येथे नातेवाईकाकडे आले असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

नुकतेच विहिरीचे काम चालू असल्याचीही माहिती समोर आली आहे.  दिलीप खीरा जाधव यांच्या विहिरीचे काम शेतात चालू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दोघाही मृत मायलेकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी दुपारी उशिरापर्यंत काम सुरु होते. मायलेकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडालाय.

हे सुद्धा वाचा

बीडमध्ये विहिरीत वडिलांसह मुलगाही बुडाला

दरम्यान, तिकडे बीडमध्ये वडिलांना बुडताना वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतलेल्या मुलाचाही मृत्यू झाला होता. तर वडील आणि भावाला वाचण्यासाठी उतरलेल्या दुसऱ्या मुलाला आईने वाचवलं. मात्र वडील आणि मुलाच्या मृत्यूची घटना बीडमध्ये ताजी असतानाच आता धुळ्यातही हृदय हेलवाणारी घटना समोर आली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें