डायरीने उलगडले वलसाडमधील तरुणीच्या आत्महत्येचे रहस्य; ट्रेनमध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण

गुजरात क्वीन ट्रेन 4 नोव्हेंबरला सकाळी वलसाड रेल्वे स्थानकावर पोहोचली. यावेळी ट्रेनमध्ये सफाई करणार्‍या एका सफाई कामगाराने मुलीचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिला. यानंतर स्टेशन मास्तर आणि वलसाडच्या जीआरपी टीमला माहिती दिली. वलसाड जीआरपीच्या तपासात मृत व्यक्तीकडे रेल्वेचे तिकीट सापडले नाही.

डायरीने उलगडले वलसाडमधील तरुणीच्या आत्महत्येचे रहस्य; ट्रेनमध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण
आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र

वलसाड : दिवाळीच्या दिवशी सकाळी गुजरातमधील वलसाड रेल्वे स्थानकावर गुजरात क्वीन ट्रेनच्या डब्यात एका तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात आता नवीन खुलासा करण्यात आला आहे. मुलीच्या घरी सापडलेल्या डायरीने तिच्या आत्महत्येचे रहस्य उलगडले आहे. मुलीच्या घरातून सापडलेल्या डायरीतून सामूहिक बलात्काराचा धक्कादायक खुलासा झाला आहे. दिवाळीच्या दोन दिवस आधी दोन ऑटोचालकांनी तिचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचे मुलीने डायरीत लिहिले आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

मृत तरुणी महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थीनी

गुजरात क्वीन ट्रेन 4 नोव्हेंबरला सकाळी वलसाड रेल्वे स्थानकावर पोहोचली. यावेळी ट्रेनमध्ये सफाई करणार्‍या एका सफाई कामगाराने मुलीचा मृतदेह फासावर लटकलेला पाहिला. यानंतर स्टेशन मास्तर आणि वलसाडच्या जीआरपी टीमला माहिती दिली. वलसाड जीआरपीच्या तपासात मृत व्यक्तीकडे रेल्वेचे तिकीट सापडले नाही. मात्र, तिच्याकडे सापडलेल्या मोबाईलवरून पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. यानंतर असे समजले की, मृत तरुणी वलसाड येथे राहत असून वडोदरा येथील एका महाविद्यालयात प्रथम वर्षाची विद्यार्थीनी होती. ती वडोदरा येथील मुलींच्या वसतिगृहात राहत होती.

दोन रिक्षाल्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा डायरीत उल्लेख

मृत तरुणीच्या घरातून तिची एक डायरी सापडली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या रुमवर परतत होती. यावेळी तिने रिक्षा केली. मात्र काही वेळाने दुसरी व्यक्ती आली आणि रिक्षामध्ये बसली आणि दोघांनी चाकूच्या धाकावर तिचे अपहरण केले आणि वडोदरा येथील महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपी पळून गेले, असे डायरीत लिहिले आहे.

बसचा चालक आणि वाहकाने केली मदत

यानंतर तेथून जाणाऱ्या बसच्या चालक आणि वाहकाने तिला तिच्या रुमपर्यंत पोहोचण्यास मदत केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा रिक्षाचालकाने तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने डायरीत आरोपीची ओळख किंवा ऑटोच्या क्रमांकाबाबत काहीही लिहिलेले नाही. आरोपींसोबतच पीडितेला मदत करणाऱ्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टरचाही पोलीस शोध घेत आहेत, त्यांच्याकडून काही माहिती मिळू शकेल.

अभ्यासात हुशार होती

तरुणीच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या दिवशी ती ट्रेनने घरी परतणार होती. पण, सकाळीच तिच्या आत्महत्येची बातमी आली. तरुणी ही अभ्यासात हुशार होती. दहावीच्या गुणवत्ता यादीत तिचे नाव होते. याशिवाय ती एका एनजीओशीही संबंधित होती. ही स्वयंसेवी संस्था आत्महत्या करणार्‍या लोकांना आणि विद्यार्थ्यांना चुकीचे पाऊल उचलू नये आणि संकटांना धैर्याने सामोरे जाऊ नये यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम करते. मात्र, पीडितेनेच आत्महत्येचे पाऊल उचलले. (Diary reveals mystery of young woman’s suicide in Valsad)

इतर बातम्या

उत्तर प्रदेश : नमकीन आणण्यासाठी गेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही; दोन दिवसांनी नाल्यात सापडला मृतदेह

गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीसोबत तालिबानी कृत्य; चेहऱ्याला काळं फासलं, मुंडण केलं नंतर आगीचा मटका घेऊन गावभर फिरवलं

Published On - 9:51 pm, Sat, 13 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI