AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीसोबत तालिबानी कृत्य; चेहऱ्याला काळं फासलं, मुंडण केलं नंतर आगीचा मटका घेऊन गावभर फिरवलं

पोलीस अधीक्षक (पाटण) अक्षयराज मकवाना यांनी सांगितले की, वाडी जमातीच्या लोकांनी मुलीला तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची शिक्षा दिली आणि तिचे मुंडण केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे.

गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीसोबत तालिबानी कृत्य; चेहऱ्याला काळं फासलं, मुंडण केलं नंतर आगीचा मटका घेऊन गावभर फिरवलं
गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीसोबत तालिबानी कृत्य
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 9:45 PM
Share

गुजरात : प्रियकरासोबत पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीसोबत तालिबानी कृत्य केल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील हरिज गावात घडली आहे. गावकऱ्यांनी प्रथम मुलीच्या चेहऱ्याला काळं फासलं, त्यानंतर तिचं मुंडण केलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. यानंतर तिच्या डोक्यावर अग्नीकांडाने भरलेले मडके ठेवून तिला गावभर फिरवण्यात आलं. पीडित 14 वर्षीय मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप आहे. ही घटना गेल्या मंगळवारी (9 नोव्हेंबर) घडली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 22 जणांना अटक करण्यात आली आहे.

वाडी जमातीच्या लोकांनी दिली शिक्षा

पोलीस अधीक्षक (पाटण) अक्षयराज मकवाना यांनी सांगितले की, वाडी जमातीच्या लोकांनी मुलीला तिच्या प्रियकरासह पळून गेल्याची शिक्षा दिली आणि तिचे मुंडण केले. तिच्या चेहऱ्याला काळं फासले. यानंतर डोक्यावर आग असलेले भांडे ठेवून तिला गावभर फिरवले. वाडी जमातीच्या लोकांचा असा दावा आहे की मुलीने आपल्या कृत्याने आपल्या जमातीची बदनामी केली आहे.

सजा दिल्यानंतर साखरपुडाही केला

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये लोक तिला ‘शुद्ध’ करण्यासाठीचा विधी म्हणून तिचे मुंडण आणि चेहरा काळा करताना दिसत आहेत. मुलगी रडताना दिसत आहे. गावकऱ्यांनीही शिक्षा म्हणून मुलगी आणि तिच्या प्रियकराला गावभर फिरवलं. यानंतर मुलीच्या घरच्यांनी स्वतः तिचा साखरपुडा त्यांच्या जमातीतील एका मुलाशी केला.

प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

एसपी म्हणाले की, ज्या मुलासोबत मुलगी पळून गेली होती त्याच्याविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर मुलीचे अपहरण करून तिला खेडा जिल्ह्यातील डाकोर येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणखी एक एफआयआर नोंदवण्यात आला असून आरोपींवर आयपीसी, बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याची संबंधित कलमे लावण्यात आली आहेत. (Taliban acts with a minor girl in Gujarat; punishment for going with boyfriend)

इतर बातम्या

उत्तर प्रदेश : नमकीन आणण्यासाठी गेली अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही; दोन दिवसांनी नाल्यात सापडला मृतदेह

पाकिस्तानात महिला पोलिसाचे घृणास्पद कृत्य, महिला कैद्याला नग्न नाचवले

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.