AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुसंस्कृत ठाणं हादरलं… अल्पवयीन गतिमंद मुलीचा आई-आजीनेच घेतला जीव

ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या वेदना न पहावल्यानेच तिच्या आईने आणि आजीने हा टोकाचा निर्णय घेत मुलीचं आयुष्य संपवल्याची चर्चा आहे

सुसंस्कृत ठाणं हादरलं... अल्पवयीन गतिमंद मुलीचा आई-आजीनेच घेतला जीव
क्राईम न्यूजImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Feb 25, 2025 | 2:12 PM
Share

ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन दिव्यांग मुलीची तिच्या आईने आणि आजीनेच हत्या केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या वेदना न पहावल्यानेच तिच्या आईने आणि आजीने हा टोकाचा निर्णय घेत मुलीचं आयुष्य संपवल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे ठाणे शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. एवढंच नव्हे तर त्यानंतर त्या दोघींनी त्या मुलीचा मृतदेह हा साताऱ्याला गावी नेला आणि तिथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असाही दावा करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेचा एक सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. अल्पवयीन मुलीची आी, तिची आजी आणि त्या मुलीच्या आईची मैत्रीण अशा तिघींनी त्या अल्पवयीन मुलीला चादरीत गुंडाळून एका खाजगी गाडीमधून साताऱ्याला नेलं असं त्या सीसीटीव्हीमध्ये दिसलं होतं. या सगळ्या प्रकरणामुळे खळबळ माजलेली असतानाच त्या मुलीच्या वडिलांनी, राजेश पवार यांनी मात्र पोलिसांनी केलेला गुन्हा हा खोटा असल्याचा आरोप केला आहे.

माझ्या मुलीला उपचारासाठी साताऱ्यातील वाई या भागात नेण्यात येत होतं. पण रस्त्यात तिला काय झालं हे मला माहित नाही. आणि त्यानंतर तिचे अंत्यसंस्कार त्या ठिकाणीच करण्यात आले, असा दावा पवार यांनी केला. माझी देखील चौकशी करण्यात आली, मात्र मी पोलिसांना याबाबतचा खुलासा दिला. माझी मुलगी गेल्या 17 वर्षांपासून मतिमंद आहे. जर बाप 17 वर्ष सांभाळू शकतो, तर असं कृत्य करू शकतो का? असा सवालही पवार यांनी विचारला. माझी मुलगी गतिमंद असल्याने ती रात्रीच्या सुमारास उठायची आणि आरडाओरडा करायची त्यामुळे तिला झोपेची गोळी दिली होती. गेल्या चार दिवसांपासून माझी मुलगी जेवण नव्हती करत त्यामुळे तिला उपचारासाठी सातारा हा भागात नेण्यात येत होत,असा दावाही त्यांनी केला.

कशी उघडकीस आली घटना ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला स्नेहल पवार आणि सुरेखा महागडे यांनी गुंगीच्या गोळ्या देऊन त्यांच्या अल्पवयीन लेकीचा जीव घेतला. ती मुलगी ही जन्मापासूनच अपंग आणि गतिमंद होती. तिला 15 फेब्रुवारीपासून प्रचंड शारीरिक यातना होऊ लागल्या होत्या. तिच्या या आजारपणाला कंटाळलेल्या आई आणि आजीने 19 फेब्रुवारीला रात्री तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. झोपेच्या जास्त गोळ्यांचे सेवन केल्यामुळे यशस्वीचा मृत्यू झाला. यानंतर आई आणि आजीने एका गाडीने तिचा मृतदेह सातारा जिल्ह्यातील परसणी गावात नेला. तिकडे या दोघींनी यशस्वी हिच्यावर अंत्यसंस्कार केले.

यासंदर्भात प्रथमदर्शनी साक्षीदार पप्पू मोमीन याने प्रतिक्रिया दिली. त्या दिवशी काय घडलं हे त्याने थेट सांगितलं. ” मी रात्रीच्या सुमारास दीड वाजता घरी आलो तर माझ्यासमोर एक अज्ञात गाडी उभी होती. मला त्या गाडीवर संशय आला. मी गाडीवाल्याला विचारलं तर त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, मी मदतीसाठी आलोय असं सांगितलं. तो बोलत असतानाच एका चादरीमध्ये गुंडाळून एक मृतदेह आणण्यात आला. मी त्या मुलीचे जेव्हा पाय बघितले तेव्हा ती कुठलाही प्रतिसाद देत नव्हती. मी 15 ते 20 सेकंद त्या ठिकाणी उभा होतो. तिची हालचाल का होत नाही म्हणून मला संशय आला, काहीतरी लपवण्याचं काम या ठिकाणी होत आहे असं वाटलं. ती गाडी जाण्याच्या अगोदरच मी त्या गाडीचे फोटो काढले. त्यानंतर मी स्थानिक पोलीस ठाण्यात या सर्व बाबतचा पुरावा दिला. या पुराव्यानंतर पोलिसांनी त्याबाबत कारवाई केली”असे त्यांनी सांगितलं.

अनेक वर्षांपासून मी या ठिकाणी राहत आहे. पोलिसांनी रात्री तपासाला सुरुवात केली. आम्हाला पोलिसांकडून समजलं की या लोकांनी मुलीच्या माहेरी त्या मुलीचा अंत्यसंस्कार करण्यात आला. आम्ही वाडीची लोक आहेत जर काही घडलं असतं तर आम्ही देखील या अंत्यसंस्कारला उपस्थित राहिलो असतो असा सवाल स्थानिक नागरिकांनी विचारला.

एक चिमुकली होती चालू शकत नव्हती बोलू शकत नव्हती. आमच्यासमोर लहानाची मोठी झाली, या लोकांनी तिची हत्या करून मृतदेहाची विल्हे वाट लावण्यासाठी का नेलं.हे सर्व गोष्टी प्लॅनिंग करून या लोकांनी केलं.मी आईला याबाबत विचारलं मात्र आईने एकाही प्रश्नाचे उत्तर दिलं नाही. आणि ती घरी निघून गेली, आजीही सोबत होती. त्या मुलीला औषध देऊन मारण्यात आला आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...