आधी दाबला पत्नीचा गळा, मग थेट घेतला सासऱ्याचा जीव, त्यानंतर झाडली गोळी, संपूर्ण परिसर हादरला
नुकताच एक अत्यंत धक्कादायक अशी घटना घडलीये. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. एकाच रात्री तब्बल तीन जणांचा मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे एका तरुणाने दारूच्या नशेत आपल्याच पत्नीचा गळा दाबून जीव घेतला. या घटनेनंतर लोक हैराण झाल्याचे देखील बघायला मिळतंय.

मुंबई : उत्तर प्रदेश येथे खळबळजनक घटना घडलीये. या घटनेनंतर उत्तर प्रदेश हादरल्याचे बघायला मिळतंय. नशेमध्ये एका व्यक्तीने आपले संपूर्ण कुटुंब उद्धवस्त केल्याचे बघायला मिळतंय. या घटनेनंतर लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. हमीरपूरमध्ये दारूच्या नशेत तरुणाने होत्याचे नव्हते केले. दारू पिऊन आल्यामुळे तरुणाचा पत्नीसोबत वाद झाला. यानंतर सर्वजण झोपायला गेल्यानंतर त्याने चक्क पत्नीचा गळा आवळून थेट खून केला. तो तरुण इतक्यावरच थांबला नाही तर चक्क पत्नीच्या मृतदेहाला त्याने पेटवून दिले.
यावेळी तरुणाचा सासरा देखील घरी होता. अचानक झोपेतून जाग आली समोर सुरू असलेला प्रकार पाहून सासरा हादरून गेला. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी धावला. मात्र, त्या तरुणाने दारूच्या नशेत थेट सासऱ्याचा देखील जीव घेतला. थेट आपल्या सासऱ्याला या तरुणाने दगडाने ठेचून मारले. सासऱ्याची देखील हत्या केली. यावेळी घरात यांचे तीन लेकरं देखील होती.
हा सर्व प्रकार त्या चिमुकल्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितला. यानंतर या लहान मुलांचा थरकाप उडाला. हमीरपूर जिल्ह्यातील रथ कोतवाली शहरातील लीलावती परिसरात ही हैराण करणारी घटना घडलीये. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा देखील दाखल केलाय.
धक्कादायक म्हणजे आपल्या पत्नीचा आणि सासऱ्याचा जीव घेतल्यानंतर या तरुणाने थेट स्वत: वर देखील गोळी झाडली आणि आपली जीवनयात्रा संपवली. सासऱ्याला आणि पत्नीला मारल्यानंतर तो मुलांना देखील मारण्याच्या तयारीत होता. मात्र, मुले घाबरली होती, यानंतर त्याने स्वत: वरच गोळी झाडली. पोलिस या प्रकरणातील तपास करत आहेत.
या तरुणाला तीन लेकरं आहेत. प्रत्यक्ष सर्व बघितलेल्या यांच्या सात वर्षाच्या मुलीने पोलिसांना सांगितले की, त्यांचे वडील कायमच दारू पिऊन घरी येत असत. यामुळे आईमध्ये आणि त्यांच्यामध्ये दररोज वाद होत. दारू पिल्यानंतर ते दररोज मारहाण करत असत. सासरा कामानिमित्त मुलीकडे आला होता आणि उशीर झाल्याने तो मुक्कामाला थांबला. मात्र, तरुणाने सासऱ्याचा देखील जीव घेतला.