AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED ने मुंबईत आठ ठिकाणी टाकली रेड, कारण काय?

मुंबईत ईडीकडून आज आठ ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात आली. ईडीच्या मुंबई झोन वनच्या पथकाने ही कारवाई केली. ईडीने इतकी मोठी कारवाई का केली? त्यामागची कारणं काय? जाणून घ्या.

ED ने मुंबईत आठ ठिकाणी टाकली रेड, कारण काय?
ED Raid
| Updated on: Oct 08, 2025 | 10:00 AM
Share

मुंबईत ईडीने आज छापेमारीची कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई झोन वनच्या पथकाकडून मोठी छापेमारीची कारवाई करण्यात आली. फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्या ड्रग सिंडिकेटवर कारवाई झाली. ड्र्ग्ज विक्रीतून मिळवलेला पैसा हा मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय आहे. सलेम डोला ड्रग्ज तस्करीमधील मोठं नाव आहे. आधीपासून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सलीम डोला दाऊद टोळीशी संबंधित आहे.

ईडीकडून मुंबईच्या डोंगरी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. मुंबईत एकूण आठ ठिकाणी ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. ड्रग सिंडिकेटचा प्रमुख सलीम डोला हा भारताबाहेर आहे. त्याच्या नेटवर्कच्या माध्यमातून ड्रग तस्करी सुरु होती. फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्याशी संबंधित डोंगरी येथे ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. तपास यंत्रणा सलीम डोलाच्या मागावर आहेत. भारतात त्याचं कसं प्रत्यर्पण होईल याचा प्रयत्न आहे. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. सलीम डोला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे.

देशभरात 15 ठिकाणी छापेमारी

आज पहाटेपासून ईडीकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. एमडी ड्रग हे मोठ्या किंमतीला विकलं जातं. आज ईडीकडून देशभरात 15 ठिकाणी छापेमारीची कारवाई झाली. नवी दिल्ली, गुरगाव येथे छापेमारीची कारवाई झाली. बनावट कॉल सेंटर प्रकरणी छापेमारीची कारवाई सुरु आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे.

करुणा मुंडेंची मोठी घोषणा, 'या' ठिकाणाहून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
करुणा मुंडेंची मोठी घोषणा, 'या' ठिकाणाहून उतरणार निवडणुकीच्या रिंगणात.
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!
RSS स्वयंसेवकाचं मनसेत काय काम? पिट्याभाईला राज ठाकरेंनी खडसावलं!.
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम
जरांगेंना ठार मरण्यासाठी 3 प्लॅन! जरांगेंनी सांगितला A टू Z घटनाक्रम.
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्...
भास्कर जाधवांच्या मुलानं योगेश कदमांच्या कार्यकर्त्याला धुतलं अन्....
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात
लोणार सरोवरातील खारं पाणी झालं गोडं! मासे दिसल्यानं जैवविविधता धोक्यात.
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले
'तो' मुंडेंचा PA, त्यानं मला ठार... जरांगेंच्या आरोपांनी राज्य हादरले.
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन
मनसे कार्यकर्त्यांकडून विहिरीत उतरून मतदारांचा शोध अन् अनोखं आंदोलन.
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप
1800 कोटीची जमीन 300 कोटीत, स्टॅम्प ड्युटीही माफ! पार्थ पवारांवर आरोप.
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले...
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, दादांनी झटकले हात अन् म्हणाले....
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव
जरांगेंच्या हत्येचा कट, अडीच कोटींची सुपारी अन् बड्या नेत्याचं नाव.