पेटीएम, रेझर पे, कॅशफ्रीवर ईडीच्या धडाधड धाडी, ‘या’ प्रकरणात कारवाई

ईडीला छाप्यादरम्यान आढळले की, कारवाई केलेल्या कंपन्या एकापेक्षा अधिक मर्चंट आयडी, पेमेंट गेटवे व बँक खात्यांद्वारे फसवणुकीची गुन्हे करीत आहेत. तसेच या कंपन्या नोंदणीकृत पत्त्यावर कार्यरत नाहीत.

पेटीएम, रेझर पे, कॅशफ्रीवर ईडीच्या धडाधड धाडी, 'या' प्रकरणात कारवाई
पेटीएम, रेझर पे, कॅशफ्रीवर ईडीच्या धडाधड धाडीImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 1:51 AM

नवी दिल्ली : आर्थिक अफरातफर प्रकरणात सक्रिय झालेल्या ईडी (ED)ने शनिवारी डिजिटल पेमेंट कंपन्यांवर लागोपाठ छापे (Raid) टाकले. रेझर पे, पेटीएम आणि कॅशफ्रीच्या कार्यालयांवर चिनी कर्ज अॅप्स (Chinese Loan Apps) प्रकरणात ही धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट कंपन्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ईडीने या कारवाईत 17 कोटी रुपयांच्या रकमेवर टाच आणली आहे. ईडीकडून शुक्रवारी बेंगळुरूमधील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानंतर शनिवारी ही कारवाई सुरुच होती.

कंपन्यांनी बनावट पत्त्यांवर थाटला ‘धंदा’

ईडीला छाप्यादरम्यान आढळले की, कारवाई केलेल्या कंपन्या एकापेक्षा अधिक मर्चंट आयडी, पेमेंट गेटवे व बँक खात्यांद्वारे फसवणुकीची गुन्हे करीत आहेत. तसेच या कंपन्या नोंदणीकृत पत्त्यावर कार्यरत नाहीत. या कंपन्या बनावट पत्त्यांवर काम करत असल्याचा ईडीचा आरोप आहे.

छाप्यांदरम्यान चिनी व्यक्तींच्या नियंत्रणाखालील कंपन्यांचे व्यापारी आयडी तसेच त्यांच्या बँक खात्यांमधून 17 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

बनावट कागदपत्रे, डमी डायरेक्टर!

यापैकी काही कंपन्या अॅप्सद्वारे कर्ज वितरित करतात. बहुतेक चिनी अॅप्स आहेत. त्यात मनी लाँड्रिंग झाल्याच्या संशयातून ईडी कसून तपास करीत आहे. ईडी मागील काही काळापासून चिनी कर्ज अॅप प्रकरणांची चौकशी करत आहे.

काही कंपन्या बेकायदेशीरपणे पैसे कमवत असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. भारतीयांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून त्यांना डमी डायरेक्टर बनवण्याचे काम कंपन्यांकडून केले जात आहे.

डिजिटल कंपन्यांतील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणी मनी लाँड्रिंगचा खटला दाखल करण्यात आला आहे. बंगळुरू पोलीस सायबर क्राइम स्टेशनने दाखल केलेल्या किमान 18 एफआयआरवर हा खटला आधारित आहे.

संबंधित कंपन्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या नोंदणीकृत पत्त्यावर कार्यरत नाहीत. त्या कंपन्या बनावट पत्त्यांवरून काम करत आहेत, असे ईडीला अधिक तपासादरम्यान आढळले आहे.

ऑनलाइन कर्ज कंपन्यांवर ईडीची वक्रदृष्टी

देशातील सुमारे 365 कर्ज अॅप्स आणि नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFCs) भागीदारी यामधील मनी लॉन्ड्रिंगची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये सुमारे 800 कोटी रुपयांची आर्थिक अफरातफर झाल्याचा दाट संशय आहे.

गेल्या महिन्यात ‘वझीरएक्स’वर केली होती कारवाई

ईडीने गेल्या महिन्यात क्रिप्टोकरन्सी चालवणाऱ्या ‘वझीरएक्स’वर कारवाई केली होती. त्या कारवाईदरम्यान ईडीने 64.67 कोटी रुपये गोठवले होते. फसवणूक करणाऱ्या कंपन्यांना मोबाइल अॅपद्वारे कर्ज देऊन त्यांचे पैसे क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून परदेशात पाठवल्याच्या आरोपावरून ईडीने ही कारवाई केली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.