AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime Govind Barge Death : नर्तकीवर पाण्यासारखा खर्च, पण मरताना गोविंदच्या खिशात मात्र… नवीन अपडेट समोर !

Govind Barge Death : वर्षभराच्या काळात गोविंद बर्गेने पूजासाठी महागडे मोबाईल, लाखोंचे दागिने, पैसे, जमीनीसाठी मदत करत भरपूर पैसे उधळले. मात्र त्यानंतरही पूजाच्या मागण्या काही थांबतच नव्हत्या. ती गोविंद बर्गेंकडे सतत नव्या मागण्या करायची आणि त्या पूर्ण करण्यासाठी ब्लॅकमेलही करायची. यामुळेच गोविंद बर्गे तणावात होते.

Beed Crime Govind Barge Death : नर्तकीवर पाण्यासारखा खर्च, पण मरताना गोविंदच्या खिशात मात्र... नवीन अपडेट समोर !
मरताना गोविंद बर्गेच्या खिशात किती पैसे सापडले ?Image Credit source: social media
| Updated on: Sep 16, 2025 | 3:39 PM
Share

बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावचे माजी उपसरंपच असलेल्या गोविंद बर्गे (Govind Barge) यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता. घरी मुलं, बायको, कुटुंब असतानाही ते कलाकेंद्रातील पूजा गायकवाडच्या (Pooja Gaikwad)प्रेमात पडले. अवघ्या 21 वर्षांच्या पूजानेही त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिचा चांगलाच फायदा करून घेतला. तिच्याच प्रेमात वेडा झालेल्या गोविंद बर्गे यांनी गेल्या सोमवारी टोकाचं पाऊल उचलतं आयुष्य संपवलं.त्यांच्या मृत्यूमुळे ोठी खळबळ माजली असून नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यावर पोलिसांनी नर्तिका पूजाला अटक केली. सध्या ती न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांच्या चौकशीतून रोज नवनवे खुलासे होत आहेत.

वर्षभरापासून गोविंदकडून अनेक गोष्टी , महागडा मोबाईल, दागिने , पैसे घेणाऱ्या पूजाचा गोविंद याच्या गेवराईच्या बंगल्यावर डोळा होता. तो बंगला नावावर करण्यासाठी ती मागे लागली आणि ब्लॅकमेलही करत होती. त्याच सततच्या मागण्या, धमक्यांमुळे गोविंद तणावात होता. माझं ऐकलं नाही तर तुझ्य़ावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकीही पूजाने त्याला दिली होती. यामुळे निरा झालेल्या गोविंदने शेवटचा उपम्हणून सासुरे गावात जाऊन पूजाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. तिला व्हिडीओ कॉलही केला, मात्र ती त्याच्याशी बोललीच नाही , अखेर तिथून निघून गेल आणि दुसऱ्या दिवशी कारमध्ये त्याचा मृतदेह आढळला.

मरताना गोविंदच्या खिशात किती रुपये ?

आता याच प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. वर्षभरात गोविंदने पूजाला अनेक भेटी दिल्या, घरखरेदीसाठी आर्थिक मदत केली, एक प्लॉटही विकत घेऊन दिला. थोडक्यात काय तर त्या तिच्यावर अक्षरश: पाण्यासारख3 पैसा उधळला. मात्र त्याच गोविंद बर्गेच्या मृत्यूसमयी त्यांच्या खिशात अवघे 900 रुपये होते अशी महत्वाची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर ज्या कारमध्ये गोविंदचा मृतदेह सापडला, त्या कारमध्ये बिअरचे काही कॅन सापडले अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

Govind Barge Death : गोविंद बर्गे प्रकरणात मोठी माहिती, त्याचा मोबाईल बंद आणि.. शेवटच्या 5-6 दिवसांत काय घडलं ? मित्रांनी काय सांगितलं ?

पूजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

गेल्या आठवड्यात गोविंद बर्गेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं. कोर्टाने तिला पोलीस कोठडी ठोठावली होती , काल मुदत संपल्यावर तिला पुन्हा कोर्टात हजर केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. आठवडाभरात पोलिसांनी पूजाची कसून चौकशी केली असून त्यातून अनेक महत्वाच्या बाबी उघड झाल्या आहेत. आपलेगोविंदचे प्रेमसंबंध असल्याचे तिने कबलू केले.

Beed Crime Govind Barge Death : गोविंद बर्गे प्रकरणातील नर्तकी पूजाचा नवा कारनामा, लॉज कनेक्शन आले समोर

एवढेच नव्हे तर ते दोघे पक्त कलाकेंद्रातच नव्हे तर कधी फ्लॅटवर, कधी घरी तर कधी कधी बीड आसपासच्या लॉजमध्येही सोबत रहात असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी फक्त पूजा गायकवाड हिचीच नव्हे तर तिचे सहकारी आणि तिच्या काही मैत्रिणी यांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत.

तर गोविंदचा जीव वाचला असता ?

पूजाने गोविंदकडे गेवराईच्या बंगल्याची मागणी केली होती. तसेच त्याच्या नावे असलेली जमीन भावाच्या नावे करण्याचीही तिची मागणी होती. मात्र गोविंदने ते ऐकण्यास नकार दिला. तेव्हापासूनच पूजाचं वागणं बदललं. ती त्याच्याशी बोलणं, भेटणं टाळू लागली, फोनही उचलायची नाही. बराच प्रयत्न करूनही ती तिच्या मागण्या सोडत न्वहीत, उलट गोविंदलाचा ब्लॅकमेल करत होती. घटनेच्या दिवशीही गोविंदने तिला खूप फोन केले, पण ती भेटली ाही म्हणून तिची समजूत काढण्यासाठी तो सासुरे गावातील तिच्या घरी गेला.

Beed Crime Govind Barge Death : चॅटिंगदरम्यान अनेकदा दिली धमकी, गोविंद बर्गे मृत्यूप्रकरणात मोठा खुलासा

तिथे पूजा नव्हती, गोविंदेन तिच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी फारशी दाद दिली नाही. सगळीकडून कोंडी झाल्यानंतर गोविंद हे पूजाच्या आईच्या घरासमोर गेला आणि त्याने व्हिडीओ कॉलवर आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र समोरून कोणीच प्रतिसाद दिला नाही. अखेर तो तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासूनच काही अंतरावर कारमध्ये त्याचा मृतदेह सापडला. तेव्हा पूजा त्यांच्याशी बोलली असती तर कदाचित गोविंद बर्गेंचा जीव वाचला असता

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!