AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेखा जरे हत्याकांड : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब, महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती

रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार विजयमाला माने यांचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली

रेखा जरे हत्याकांड : प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब, महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती
| Updated on: Dec 06, 2020 | 4:06 PM
Share

अहमदनगर : अहमदनगरमधील रेखा जरे हत्याकांड प्रकरणी (Rekha Jare Murder Case) महत्त्वाचे धागेदोरे हाती येण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांचा जबाब आज नोंदवण्यात आला. त्यामुळे त्या दिवशी नेमकं काय घडले याबाबतच सत्य समोर येणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची गेल्या आठवड्यात भररस्त्यात हत्या झाल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. (Eye witness testimony in Ahmednagar Rekha Jare Murder Case)

रेखा जरे हत्याकांडातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी रात्री हत्या झाली, तेव्हा मानेही त्यांच्यासोबत कारमध्ये होत्या. हे हत्याकांड त्यांनी प्रत्यक्ष पाहिले असल्याने त्यांचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा आहे.

शवविच्छेन अहवाल पोलिसांकडे

रेखा जरे यांच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. यामध्ये गळा चिरुन हत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच जरे यांच्या खांद्याजवळही जखम झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रेखा जरे यांची हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र अद्यापही जरे यांच्या हत्येचं खरं कारण समोर आलं नाही. त्यामुळे मुख्य सूत्रधार असलेला पत्रकार बाळासाहेब बोठे याला पोलीस कधी अटक करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत मारेकऱ्यांना पकडले होते. मारेकऱ्यांची चौकशी केली असता पत्रकार बाळासाहेब बोठे यानेच 6 लाख रुपये देऊन रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.

कोण आहे बाळासाहेब बोठे?

बाळासाहेब बोठे अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्याने राज्यातील नावाजलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातमीदार, मुख्य बातमीदार, राजकीय संपादक आणि निवासी संपादक अशा विविध पदांवर काम केलं आहे. याशिवाय काही फिचर वेबसाईटसाठीही त्याने लिखाण केलं आहे.

पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला आहे. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी देखील बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. त्याच्या ‘राजकारण आणि माध्यमं’ या पुस्तकाचाही एम. ए. अभ्यासक्रमातील राज्यशास्त्र विषयात संदर्भग्रंथ म्हणून समावेश आहे. हेच पुस्तक यावर्षी कला शाखेच्या द्वितीय वर्षाच्या राजकीय पत्रकारिता विषयाच्या अभ्यासक्रमात संदर्भग्रंथ म्हणून निवडले गेले आहे.

नाट्यमय हत्याकांड

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. (Eye witness testimony in Ahmednagar Rekha Jare Murder Case)

रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आई असल्याची माहिती होती. त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी विजयमाला मानेही सोबत असल्याचं समजलं. कारची काच बाईकला लागल्यामुळे जरे मायलेकाशी दुचाकीस्वारांचा वाद झाला. या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले होते.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन दिवसांच्या आत तीन आरोपींना अटक केली. फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके या तिघा आरोपींना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं वाटत होतं, परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येला वेगळा रंग आला.

संबंधित बातम्या :

रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठेविरोधात लूकआऊट नोटीस जारी

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

(Eye witness testimony in Ahmednagar Rekha Jare Murder Case)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...