AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलकातामध्ये बनावट सीबीआय अधिकारी अटकेत, व्यापाऱ्यांचे अपहरण करीत होते खंडणी वसुल

या बनावट सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीत महिला वकिलांपासून ते आयटी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. (Fake CBI officer arrested in Kolkata, traders kidnapped for ransom)

कोलकातामध्ये बनावट सीबीआय अधिकारी अटकेत, व्यापाऱ्यांचे अपहरण करीत होते खंडणी वसुल
कोलकातामध्ये बनावट सीबीआय अधिकारी अटकेत
| Updated on: Jun 01, 2021 | 8:38 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नुकत्याच झालेल्या नारदा स्टिंग ऑपरेशन(Narada Sting Operation)मध्ये सीबीआय(CBI)ने ममता बॅनर्जी यांच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना अटक करणे हा एक राजकीय मुद्दा होता, परंतु कोलकात्यामध्ये फेक सीबीआय टोळी सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे, जी लोकांचे अपहरण करीत आहे. ही टोळी सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून लोकांचे अपहरण करते आणि त्यांच्या सुटकेसाठी लाखो रुपये घेतात. या बनावट सीबीआय अधिकाऱ्यांच्या टोळीत महिला वकिलांपासून ते आयटी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. (Fake CBI officer arrested in Kolkata, traders kidnapped for ransom)

कोलकाता पोलिसांच्या लालबाजार मुख्यालयातील अँटी राउडी पथकाच्या (एआरएस) सदस्यांनी कोलकाताच्या कसबा भागातील बोसुकुर रोड येथे सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत एका व्यावसायिकाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली 12 आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

सीबीआयची बनावट टीम बनून मारायचे छापे

कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की सीबीआय अधिकाऱ्यांच्या बनावट पथकाने एकच नव्हे तर अनेक व्यापाऱ्यांचे अपहरण केले आहे. यामध्ये उत्तर 24 परगनातील सहा आणि महानगराच्या बंदर क्षेत्रामधील दोन जणांचा समावेश आहे. ही टोळी सीबीआय अधिकारी म्हणून व्यापाऱ्यांच्या घरांवर ते छापे टाकत असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपी तीन-चार खासगी कारमध्ये येत असत आणि मग ते व्यापाऱ्यांना सोबत घेऊन जात. यापूर्वी ते अपहृत व्यावसायिकाकडे एक ते दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले. भीतीमुळे उद्योजकांचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवत नसत आणि त्यानंतर आरोपी समझोता करीत त्यांना 40 ते 50 लाख रुपये घेऊन सोडून देत असत.

कशी झाली बनावट सीबीआय टीमला अटक?

बनावट सीबीआय अधिकाऱ्यांनी कसबा परिसरातील अजित राय नावाच्या व्यावसायिकाचे अपहरण केले होते. बनावट सीबीआय अधिकारी त्याच्या घरी एक टीम तयार घेऊन गेले. त्यांनी तपास केला आणि मग त्यांच्यासोबत घेऊन गेले. नंतर त्याचे अपहरण झाल्याचे त्याच्या कुटुंबियांना कळले. घरातील सदस्यांनी त्याला 15 लाख रुपये देऊन मुक्त केले होते. नंतर त्याची पत्नी स्वीटी नाथ राय यांनी कसबा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे. (Fake CBI officer arrested in Kolkata, traders kidnapped for ransom)

इतर बातम्या

आरक्षणासाठी एक व्हा, समरजितसिंह घाटगे यांची मराठा समाजाला हाक

5G विरोधात अभिनेत्री जूही चावलाची हायकोर्टात याचिका, 2 जूनला सुनावणी, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...