Fake Currency: मदरसामध्ये रिकामी खोली, रात्रभर होत होती 100-100 रुपयांच्या नोटांची छापाई, मौलवीसह चौघांना अटक

Crime News: मदरसामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 178,179, 180 181 182 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

Fake Currency: मदरसामध्ये रिकामी खोली, रात्रभर होत होती 100-100 रुपयांच्या नोटांची छापाई,  मौलवीसह चौघांना अटक
नकली नोटा छापण्याच्या प्रकरणात अटक केलेले आरोपी
Follow us
| Updated on: Aug 30, 2024 | 12:39 PM

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. महाकुंभामुळे राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर कामेही सुरु आहेत. त्याचवेळी प्रयागराजमध्ये नकली नोटांचा एक कारखाना मिळाला आहे. हा कारखाना मदरसामधील एका खोलीत सुरु होता. मदरसातून विद्यार्थी गेल्यानंतर कारखान्यात शंभर, शंभर रुपयांच्या नोटांची छपाई सुरु होत होती. रात्रभर या ठिकाणी छपाईचे काम होत होते. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर छापा टाकून चौघांना अटक करण्यात आली. त्यात मदरसाचा प्रभारी प्राचार्य मौलवी मोहम्मद तफसीरुल आरीफीनसह मोहम्मद अफजल, मोहम्मद साहिद आणि मास्टर माइंड जाहीर खान उर्फ अब्दुल जाहीर यांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणावर नकली नोटा आणि नोटा छापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

असा उघड झाला प्रकार

प्रयागराजमधील सिविल लाइस पोलिसांनी सांगितले की, शहरात नकली नोटा छापल्या जात असल्याची गोपणीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केली. नकली नोटा छापण्याची धागेदोरे एका मदरसापर्यंत आले. सर्व पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी मदरसामध्ये छापा टाकला. त्यावेळी एका खोलीत नोटांची छापाई सुरु होती. पोलिसांनी मदरसाच्या मौलवीसह चार जणांना अटक केली आहे. त्या ठिकाणावरुन स्कॅनर, प्रिंटिंग मशीन आणि 100-100 रुपयांच्या 1 लाख 30 हजार रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

तीन महिन्यांपासून सुरु होता कारखाना

मदरसामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नकली नोटा छापण्याचा कारखाना सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेचे कलम 178,179, 180 181 182 (1) नुसार गुन्हा दाखल केला आहे. चार आरोपींना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय संबंधांची शक्यता

नकली नोटाच्या या रॅकेटचा संबंध आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांसोबत असण्याची शक्यता आहे. आरोपींच्या फोनच्या ब्राउजिंग हिस्ट्रीमध्ये महाकुंभसंदर्भात लिंक मिळाले आहेत. प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभात नकली नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याची तयारी आरोपींनी केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपीत मौलवी मोहम्मद तफसीरूल ओरिसामधील रहिवाशी आहेत.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.