AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्नॅपचॅट, लॉज आणि सीसीटीव्ही…मेहुण्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट फसला; सनकी वकिलाचा प्लान वाचून घाम फुटेल

आपल्या मेहुण्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उल्हासनगरातील एका वकिलाने हा सगळा कट रचल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

स्नॅपचॅट, लॉज आणि सीसीटीव्ही...मेहुण्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट फसला; सनकी वकिलाचा प्लान वाचून घाम फुटेल
ulhasnagar police case
| Updated on: Jan 18, 2025 | 1:34 PM
Share

बदलापुरात एका महिलेने आपल्यावर नोकरीच्या मुलाखतीसाठी बोलावून बलात्कार करण्यात आल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात वेगळंच सत्य समोर आलं आहे. आपल्या मेहुण्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी उल्हासनगरातील एका वकिलाने हा सगळा कट रचल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर कट रचणारा वकील आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला फरार झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगरातील वकील सन्नी चौहान याच्या पत्नीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. मात्र यामध्ये आपल्या पत्नीला तिचा भाऊ अभिषेक सिंग याची फूस असल्याचा संशय आणि राग सन्नी चौहान याला होता. त्यामुळेच त्याने अभिषेक सिंग याला बलात्काराच्या प्रकरणात अडकवण्याचा कट रचला. त्यानुसार उल्हासनगरातील एका महिलेला त्याने आपल्या कटात सामील करुन घेतलं. यासाठी प्रथमेश यादव नावाच्या तरुणाने अभिषेक सिंगच्या नावाने स्नॅपचॅट अकाऊंट उघडले. त्यावरून त्याने संबंधित महिलेशी चॅटिंग केली. तिला ३० डिसेंबरला नोकरीच्या मुलाखतीसाठी बदलापूरच्या लॉजवर येण्यास सांगितलं.

यानंतर ३० डिसेंबर रोजी सन्नी चौहान याने त्याचा मित्र भावेश तोतलानी याला अभिषेक सिंग नावाने बनावट आधार कार्ड तयार केले. त्यानंतर त्याने त्याला बदलापूरच्या एका लॉजवर पाठवलं. तिथे कटात सहभागी असणारी महिला नोकरीच्या मुलाखतीच्या निमित्ताने गेली. काही वेळाने लॉजमधून निघून तिने थेट बदलापूर पूर्व पोलीस ठाणे गाठले. यानंतर तिने अभिषेक सिंग यांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी अभिषेक सिंग याचा शोध घेतला असता तो उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये असल्याचं पोलिसांना समजलं.

पोलिसांकडून उलट्या दिशेने तपास सुरू

त्यामुळे पोलिसांची टीम दुसऱ्याच दिवशी लखनऊला रवाना झाली. मात्र अभिषेक याने आपण मागील काही दिवसांपासून लखनऊमध्येच असून त्याचे सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवले. त्यामुळे हे प्रकरण वेगळं असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी या प्रकरणाचा उलट्या दिशेने तपास सुरू केला. त्यात लॉजमध्ये आलेल्या व्यक्तीने अभिषेक सिंग या नावाचं आधारकार्ड जरी दिलं असलं, तरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा त्याचा चेहरा अभिषेकचा नसल्याचं समोर आलं.

त्यामुळे त्याचा शोध घेऊन पोलिसांनी अभिषेकच्या नावाने लॉजमध्ये गेलेल्या भावेश तोतलानी याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करण्यात आली. यावेळी त्याने हा सगळा कट अभिषेक सिंग याच्या बहिणीचा पती वकील सन्नी चौहानने रचल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी या कटात सहभागी असलेल्या भावेश तोतलानी आणि प्रथमेश यादव या दोघांना अटक केली. दुसरीकडे पोलिसांच्या या कारवाईचा सुगावा लागताच वकील सन्नी चौहान आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणारी महिला हे दोघेही फरार झाले आहेत. या दोघांचा आता पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.

वकिली पेशाला काळीमा

आपल्या पत्नीने आपल्यावर दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी मेहुण्याला बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र वकिलानेच रचल्यानं वकिली पेशाला काळीमा फासला गेला आहे. तर दुसरीकडे एखाद्या महिलेने तक्रार दिल्यानंतर तिचा गुन्हा दाखल करून घेणं गरजेचं असलं, तरी काही वेळा एखादा खोटा गुन्हाही कसा दाखल होऊ शकतो, हे ही या निमित्ताने समोर आलं आहे. मात्र बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर आणि पोलीस निरीक्षक राजेश गज्जल यांनी उघड केलेल्या या बनावट बलात्कार प्रकरणामुळे अशा प्रकारांना भविष्यात नक्कीच आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होतं आहे.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.