डॉक्टरच्या घरात मृत्यूचं साहित्य…350 किलो RDX, दोन AK-47 जप्त… काय होता खतरनाक प्लान? सर्वच हादरले
जम्मू - काश्मीर पोलिसांनी फरिदाबादमधील एका डॉक्टरच्या 300 किलो आरडीएक्स, AK-47 रायफल आणि 84 जिवंत काडतुसे जप्त केली. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

हरियाणातील फरिदाबादमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि हत्यारं जप्त केली आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या डॉक्टरने खोली भाड्याने घएतली होती. पोलिसांनी त्याच्या घरातून सुमारे 300 किलो आरडीएक्स, 2 AK-47 रायफल आणि 84 जिवंत तसेच केमिकल जप्त केलं. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष पथकाने स्थानिक पोलिसांसह डॉक्टरच्या घरावर छापा टाकला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई अन्सार गजवत-उल-हिंद (AGH) या दहशतवादी संघटनेच्या चौकशीचा एक भाग आहे. तीन डॉक्टर या संघटनेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले. त्यापैकी दोन डॉक्टर्स अदील अहमद राथर (अनंतनाग रहिवाली) आणि मुज़म्मिल शकील (पुलवामा रहिवासी) या दोघांना सहारणपुर आणि फरीदाबाद येथून अटक करण्यात आली. तर तिसरा डॉक्टर अद्याप फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
GMC मध्ये करत होता नोकरी
विशेष म्हणजे, आदिल राथर हा तोच डॉक्टर आहे ज्याचे नाव अलिकडेच आणखी एका खळबळजनक घोटाळ्यात अडकले होते. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग मेडिकल कॉलेज (GMC) येथील त्याच्या वैयक्तिक लॉकरमधून AK-47 रायफल जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी अनंतनागमधील संयुक्त चौकशी केंद्राच्या (JIC) मदतीने ही कारवाई केली. त्यावेळी आदिल राथर महाविद्यालयात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून काम करत होता, पण त्याने 24 ऑक्टोबर 2024 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अदील आणइ त्याचे सहकारी डॉक्टर्स हेअन्सार गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनेचे नेटवर्क पुन्हा सक्रिय करण्याचा प्रयत्न करत होते असा तपास यंत्रणांचा कयास आहे. 2017 साली हिजबुल मुजाहिदीनचा माजी कमांडर झाकीर मुसा याने या संघटनेची स्थापना केली होती. काश्मीरमध्ये शरिया कायद्याअंतर्गत इस्लामिक राज्य स्थापन करणे आणि भारताविरुद्ध जिहाद पुकारणे हे या संघटनेचे उद्दिष्ट आहे.
मोठ्या प्रमाणात आरडीएक्स कुठून आलं ?
एवढ्या मोठ्या प्रमाणात आरडीएक्स आणि हत्यारं ही फरीदाबापर्यंत कशी पोहोचली आणि त्यामध्ये या डॉक्टरांचा काय रोल होता, त्यांची काय भूमिका होती याचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जात आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले की अनेक राज्यांमध्ये पसरलेले एक नेटवर्क आहे आणि एजन्सीकडून काश्मीर खोरे, उत्तर प्रदेश आणि हरियाणाशी त्याचे संबंध शोधले जात आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
विविध शहरांमध्ये हल्ला करण्याचा ‘आयएस’चा मोठा कट उधळला
दरम्यान देशातील विविध शहरांमध्ये हल्ला करण्याचा ‘आयएस’चा मोठा कट उधळण्यात आला आहे. गुजरात एटीएसने अहमदाबादच्या अडालज येथून संघटनेच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तिघांपैकी एक जण चीनमधून डॉक्टर झाला आहे. तो अतिशय घातक विषाचा वापर करून दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होता.
