अभियंता वडिलाचा घातक निर्णय, पत्नीसोबतच्या भांडणाचा राग काढला मुलीवर

चंद्रशेखर नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी दोघेही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात. त्यांना मोक्षाज्ञया नावाची मुलगी आहे. ती ९ वर्षांची आहे.

अभियंता वडिलाचा घातक निर्णय, पत्नीसोबतच्या भांडणाचा राग काढला मुलीवर
अनैतिक संबंधाच्या रागातून पत्नीने पतीला संपवलेImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 20, 2023 | 4:16 PM

हैदराबाद : घरोघरी मातीच्या चुली. या म्हणीप्रमाणे घरोघरी काही ना काही वाद होत असतात. पण, हा वाद किती ताणयचा हा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतो. पती-पत्नीमध्ये वाद झाला. पत्नी माहेरी निघून गेली. तिच्यासोबत तिची ९ वर्षांची मुलगी गेली. पण, ही बाब पतीला खटकली. यातून त्याने घातक निर्णय घेतला. हैदराबाद भागात एक अमानवीय घटना समोर आली. एका निर्दयी बापाने पत्नीच्या भांडणाचा राग मुलीवर काढला. आपल्या ९ वर्षीय मुलीची पेन्सिल कटरने हत्या केली. शहरातील सीमावर्ती भागात अब्दुलापुर्मेट पोलीस ठाण्याच्या परिसरात दुर्घटना घडली होती. कार डिव्हाईडरला आदळली होती. स्थानिकांनी कारजवळ जाऊन पाहिले तेव्हा अपघात संदिग्ध असल्याचे निदर्शनास आले. कारमध्ये पाहिल्यानंतर मागील सीटवर एका मुलीचा मृतदेह सापडला. यातून त्याचे बिंग फुटले.

पत्नी पतीपासून राहत होती वेगळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर नावाचा व्यक्ती आणि त्याची पत्नी दोघेही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतात. त्यांना मोक्षाज्ञया नावाची मुलगी आहे. ती ९ वर्षांची आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. पत्नी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.

९ वर्षांच्या मुलीचा कापला गळा

मुलगी मोक्षाज्ञया आईसह आजी-आजोबांसोबत राहत होती. ती चौथ्या वर्गात शिकत होती. भीतीमुळे तिची आई तिला स्वतः शाळेत सोडण्यासाठी जात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर आपल्या पत्नीला त्रास देत होता. तो एक दिवस मुलीच्या शाळेत पोहचला. त्याने मुलीला घेतले आणि निघून गेला. पेन्सिल कटरने ९ वर्षांच्या मुलीचा गळा चिरला.

कारचा अपघात झाला आणि…

९ वर्षांची मुलगी ओरडत होती. कारचा दरवाजा लावून निर्दयी बापाने तिचा गळा चिरला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात कारचा अपघात झाला. कारचा अपघात होताच रक्ताचे डाग दिसले. कारच्या मागील भागात मुलीचा मृतदेह होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.