AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संशयाचा कळस… प्रतीक्षाच्या मोबाईलच्या लॉकला स्वत:ची फिंगरप्रिंट; ‘या’ देशात पळून जात असतानाच…

छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयातील डॉक्टर प्रतीक्षा गवारे हिने जीवन संपवलं आहे. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या नवऱ्याला अटक केली आहे. पडेगाव येथे चुलत मामाच्या घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून तो परदेशात पळून जाण्याच्या बेतात होता.

संशयाचा कळस... प्रतीक्षाच्या मोबाईलच्या लॉकला स्वत:ची फिंगरप्रिंट; 'या' देशात पळून जात असतानाच...
| Updated on: Aug 30, 2024 | 2:39 PM
Share

डॉ. प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे या डॉक्टर महिलेने आयुष्य संपवलं आहे. नवऱ्याच्या संशयी वृत्तीला कंटाळून तिने जीवन संपवलं. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यातच प्रतीक्षाने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी व्हायरल झाल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीतून प्रतीक्षाची वेदना दिसून येत आहे. तिचा झालेला छळ या चिठ्ठीतून तिने व्यक्त केला आहे. ही चिठ्ठी व्हायरल होताच तिचा नवरा प्रीतम घाबरला. तो तीन दिवस शेतात लपला. प्रतीक्षाच्या अंत्यसंस्कारालाही गेला नाही. त्यानंतर तो मामाच्या घरी गेला. तिथून त्याचा परदेशात पळून जाण्याचा बेत होता. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

प्रतीक्षा प्रकाश भुसारे-गवारे या 26 वर्षीय डॉक्टर महिलेने गेल्या आठवड्यात जीवन संपवलं होतं. नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे तिने स्वत:ला संपवून टाकलं होतं. जीव देण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहिली होती. या घटनेनंतर सिडको पोलिसांनी 28 ऑगस्ट रोजी तिचा डॉक्टर नवरा प्रीतम शंकर गवारे याला अटक केली आहे. प्रतीक्षाने आयुष्य संपवल्याची माहिती मिळताच प्रीतम घाबरला. पोलीस पकडतील या भीतीने तो तीन दिवस शेतात राहिला. त्यानंतर तो पडगेवामधील सुंदरनगर येथे चुलत मामाच्या घरी आला. पोलिसांनी त्याला इथूनच अटक केली आहे.

चेहऱ्यावर पश्चात्ताप नाही…

प्रीतमचे वैद्यकीय शिक्षण रशियाला झाले होते. त्यामुळे त्याच्याकडे रशियाचा व्हिसा होता. म्हणूनच त्याने रशियाला पळून जाण्याचा प्लान तयार केला होता. पण त्यापूर्वीच पडेगावात पोलीस आले आणि प्रीतम पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी अटक केल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चात्ताप नव्हता. उलट प्रतीक्षाच कशी चुकीची होती हे तो सांगत होता. मृत्यूनंतरही तो प्रतीक्षाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होता.

त्याचेच लग्नापूर्वी अफेयर

प्रीतम सातत्याने प्रतीक्षाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिचा मोबाईल तपासायचा. तिला येणारे फोन आणि त्यावरील मेसेजही तपासायचा. एवढेच नव्हे तर प्रीतमने तिच्या मोबाईलचा लॉकला सुद्धा स्वत:चा फिंगरप्रिंट ठेवला होता. प्रतीक्षा कामावर गेल्यावर तो तिला सतत फोन करायचा. चुकून प्रतीक्षाने फोन घेतला नाही तर तिला शिवीगाळही करायचा. इतकं करूनही तो थांबला नाही. तो सतत प्रतीक्षाला तिचा मोबाईल नंबर बदलायला सांगायचा, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. याबाबत प्रतीक्षाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. विशेष म्हणजे प्रीतमचे लग्नापूर्वी अफेयर होते, तशी कबुलीच त्याने दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.