पोलीस आणि होमगार्डकडून खाकीला कलंक, पैसे वाटपावरुन दोघांमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

मला कमी पैसे मिळाले, असा त्या दोघांचा दावा होता. त्यातूनच पुढे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गाडीत उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी मध्यस्थी केले आणि दोघांना वेगळे केले.

पोलीस आणि होमगार्डकडून खाकीला कलंक, पैसे वाटपावरुन दोघांमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पोलीस आणि होमगार्डकडून खाकीला कलंक, पैसे वाटपावरुन दोघांमध्ये हाणामारीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 06, 2022 | 1:43 AM

लखनौ : खाकी वर्दी म्हणजे कायद्याची रक्षक. पण हेच रक्षक जेव्हा आपली ओळख आणि कर्तव्य विसरतात, तेव्हा काय धम्माल घडते, ते पाहून कुणालाही धक्का बसेल. अनेकदा पैसा हेच कळीचं कारण असतं. नेमके हेच निमित्त ठरले आणि पोलीस व होमगार्डमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पैशांची बरोबर वाटणी न झाल्याच्या मुद्द्यावरून पोलीस (Police) आणि होमगार्ड (Home Guard)ने परस्परांना लाथाबुक्क्यांनी हाणामारी (Fighting) केली. केवळ एकमेकांची डोकी फोडणे बाकी राहिले होते. उत्तर प्रदेशात घडलेल्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. लोकांनी हा व्हिडिओ पाहून खाकी वर्दीच्या वर्तणुकीवर टीका नाही केली तरच नवल.

नेमके काय घडले ?

हाणामारीची ही घटना उत्तर प्रदेशच्या जालौनमध्ये घडल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या मदतीसाठी राखीव हेल्पलाईन नंबर असलेल्या डायल 100 वर तैनात असलेले हवालदार आणि होमगार्ड एकमेकांशी भिडले. दोघांनी एकमेकांवर लाथा-बुक्क्या मारण्यास सुरुवात केली.

शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दोघेही दारुच्या नशेत गाडीतून ड्युटीवर जात होते. यादरम्यान पैसे वाटण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यांच्यामध्ये पैसे वाटपाबाबत मतभेद होते.

हे सुद्धा वाचा

कमी पैसे मिळाले म्हणून जोरदार हाणामारी

मला कमी पैसे मिळाले, असा त्या दोघांचा दावा होता. त्यातूनच पुढे दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गाडीत उपस्थित असलेल्या इतर पोलिसांनी मध्यस्थी केले आणि दोघांना वेगळे केले. मात्र झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ शेजारून चाललेल्या नागरिकांनी बनवला आणि दोन्ही सुरक्षा जवानांची नशाच उडवली.

पोलीस आणि हवालदार निलंबित

रस्त्याने जाणाऱ्यांनी पोलीस आणि होमगार्डमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ बनवला आणि व्हायरल केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हवालदार आणि होमगार्ड दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

घटनेबाबत सारवासारव करीत होमगार्डने सांगितले की वसुलीदरम्यान तो कॉन्स्टेबलसोबत होता. मात्र पैसे मागितले असता त्या पोलिसाने शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र रस्त्यावर झालेल्या या मारहाणीची घटना लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे.

याप्रकरणी जालौनच्या पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, पोलिस हवालदार आणि होमगार्डमधील मारहाणीची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणाचा तपास सीओ मधौगढ यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. हवालदारला निलंबित केले आहे, तर होमगार्डला पुन्हा होमगार्ड कार्यालयात पाठवण्यात आले आहे. तसेच होमगार्ड कमांडंटला पत्र लिहून होमगार्डवर कारवाई करण्यास सांगितले आहे. असा उद्धटपणा आणि गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही, अशी सक्त ताकीद दोघांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. (Fighting between police and home guards over distribution of money in Uttar Pradesh)

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.