मार देता आणि मार खाता! नाशिकमधील राडा चर्चेत, सीसीटीव्ही पाहावंच लागेल

नाशिकच्या नाशिकरोड परिसरातील तेजस वडापाव या ठिकाणी काही मद्यधुंद टोळक्यांनी अचानक कोयत्याने हल्ला केल्यानं खळबळ उडाली होती.

मार देता आणि मार खाता! नाशिकमधील राडा चर्चेत, सीसीटीव्ही पाहावंच लागेल
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 11:16 AM

नाशिक : नाशिकच्या नाशिकरोड परिसरातील एक सीसीटीव्ही चर्चेचा विषय ठरत आहे. खरंतर मागील आठवड्यात नाशिकच्या नाशिकरोड भागात खुन्नसने का बघतो म्हणून मद्यधुंद महाविद्यालयीन टोळक्याने कोयत्याने हल्ला चढविला होता. यामध्ये संबंधित वडापाव विक्रेता तेजस गोसावी हा आढळून न आल्याने त्याचे दाजी विशाल गोसावी यांच्यावर हल्ला चढविला होता. या घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यावर पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दिवसाढवळ्या नागरिक वडापाव खात असतांना अचानक हल्ला झाल्याने उपस्थित महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये वडापाव विक्रेते आणि इतर एक जण जखमी झाले होते. त्यावरून पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही का ? असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र, पोलिसांनी याच गुन्हेगारांना चांगलाच धडा शिकवला आहे. त्याच ठिकाणी घेऊन जात बेदम चोप दिला असून याचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

नाशिकच्या नाशिकरोड परिसरातील तेजस वडापाव या ठिकाणी काही मद्यधुंद टोळक्यांनी अचानक कोयत्याने हल्ला केल्यानं खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा

तेजस गोसावी याने आमच्याकडे खुन्नस का पाहिले म्हणून महाविद्यालयातील वाद वडापावच्या गाडीपर्यन्त जाऊन पोहचले होते.

त्यावरून मद्यधुंद टोळक्याने अचानक हल्ला केल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले होते, त्यातच सीसीटीव्ही समोर आल्याने खळबळ उडाली होती.

पण, पोलीसांनी लागलीच गुन्हा दाखल करून घेत गुन्हेगारांना अटक केली होती, याशिवाय ज्या ठिकाणी हल्ला चढविला होता तेथे नेऊन बेदम चोप दिला होता.

यानंतर मात्र हल्ल्याचा सीसीटीव्ही आणि नंतर पोलीसांनी टोळक्याला दिलेला बेदम चोपचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पोलीसांनी घेतलेल्या या भूमिकेचे स्वागत केले जात असून गुन्हेगारांना असाच धडा शिकवला पाहिजे अशा प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत.

ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते
'मारकडवाडीत शरद पवार माझे काम...,' काय म्हणाले राम सातपुते.
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया
'अजित पवार यांची १००० कोटीची संपत्ती ...,'काय म्हणाल्या अंजली दमानिया.
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी
नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदी, उद्धवना खिजवण्याची तयारी.
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?
'विरोधकांचा शपथविधीवर बहिष्कार म्हणजे....',काय म्हणाले प्रवीण दरेकर?.
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम
महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम.
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.